भारतीय क्रिकेट चाहते बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यामध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे(Virat Kohli). या मालिकेतील पहिला कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबरदरम्यान पर्थ येथे खेळवला जाणार आहे.
पर्थ कसोटीपूर्वी विराट कोहलीने(Virat Kohli) आपल्या एक्स आणि इंस्टाग्राम पोस्ट्सने चाहत्यांमध्ये चिंता वाढवली आहे. या पोस्टवरून चाहत्यांना असे वाटू लागलं की, एआर रेहमान आणि सायरा बानोच्या घटस्फोटानंतर आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पाऊल उचलणार आहेत.
विराट कोहलीने X आणि Instagram वर त्याची एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये पांढऱ्या पार्श्वभूमीच्या टेम्प्लेटवर काळा मजकूर होता. विराटने पोस्टमध्ये लिहिले की, मागे वळून पाहताना, आम्ही नेहमीच थोडे वेगळे आहोत. लोकांनी आम्हाला ज्या बॉक्समध्ये बसवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आम्ही कधीच बसलो नाही. दोन लोक जे एकमेकांशी जोडलेले होते.”
त्यांनी पुढे लिहिले की, आम्ही अनेक वर्षांमध्ये खूप बदल घडवून आणले आहेत, पण नेहमी गोष्टी आमच्या पद्धतीने केल्या आहेत. काही लोकांनी आम्हाला वेडा म्हटले, काही लोकांना समजले नाही. पण, प्रामाणिकपणे, आम्हाला त्याची पर्वा नव्हती. आम्ही फक्त स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो आणि महामारीदेखील आपल्याला हादरवू शकली नाही, उलटपक्षी, वेगळे असणे ही आपली सर्वात मोठी ताकद आहे याची आठवण करून दिली.
— Virat Kohli (@imVkohli) November 20, 2024
ही पोस्ट शेअर होताच चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विराट कोहली आता निवृत्तीची घोषणा करेल, असे काही चाहत्यांना वाटू लागले होते. आता विराट आणि अनुष्का यांच्यात घटस्फोटाची वेळ आली आहे, असे काही चाहते म्हणू लागले. एका वापरकर्त्याने लिहिले – “मिनी हार्ट अटॅक”, तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले – “मला वाटले की विराट आणि अनुष्का देखील घटस्फोट घेत आहेत”, दुसऱ्या वापरकर्त्याने दुःखी इमोजीसह लिहिले – “प्रथम, पांढऱ्या पार्श्वभूमीवर लिहिणे थांबवा. बडी.”
वास्तविक, या पोस्टचा ना विराट कोहलीच्या निवृत्तीशी संबंध होता ना विराट आणि अनुष्का शर्माच्या घटस्फोटाशी. विराटची ही पोस्ट प्रमोशनल पोस्ट होती. जो त्याने ‘राँग’ ब्रँडला टॅग करून शेअर केला आहे. पण, त्यामुळे सोशल मीडियावर नक्कीच खळबळ उडाली आणि चाहत्यांना चर्चेचा नवा विषय मिळाला. विराट कोहलीची ही पोस्ट त्याची लोकप्रियता किती व्यापक आहे आणि चाहते त्याच्या प्रत्येक शब्दाकडे किती बारकाईने लक्ष देतात हे दिसून येते.
हेही वाचा :
आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडी
शुक्र-शनीची होणार युतीया’ 4 राशींचं उजळणार भाग्य,
“निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला झटका”