विराट-रोहित ओपनर…, शिवम दुबे फिनिशर…; हे असू शकते टीम इंडियाची बेस्ट प्लेइंग-11

टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघ(team india) अमेरिकेत पोहोचला आहे. येत्या 2 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आणि टीम इंडिया 5 जूनपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि कंपनी आयर्लंडशी भिडणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यानंतर मेन इन ब्लूचा सामना 9 जूनला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.

पण भारतीय संघाचा(team india) कर्णधार रोहित शर्मा कोणत्या संघासोबत मैदानात उतरणार हा एक मोठा प्रश्न आहे. कारण शुभमन गिल आणि केएल राहुलचा संघात समावेश केला नाही. याशिवाय रिंकू सिंगलाही संघात स्थान देण्यात आले नाही.

दुसरीकडे, हार्दिक पांड्या अत्यंत खराब फॉर्ममध्ये झगडत असूनही त्याला वर्ल्ड कप संघाचा भाग बनवण्यात आले आहे. त्यामुळे या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचे परफेक्ट प्लेइंग 11 कोणते असू शकतात हे जाणून घेऊया….

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. कोहलीने आयपीएल 2024 मध्ये डावाची सुरुवात केली आणि उत्कृष्ट फलंदाजी केली. या सतराव्या हंगामात विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 15 सामन्यांच्या 15 डावांमध्ये 61.75 आणि 154.69 च्या स्ट्राइक रेटने 741 धावा केल्या. या काळात त्याने 5 अर्धशतके आणि 1 शतकही झळकावले. अशा स्थितीत विराट कोहलीचा फॉर्म पाहता त्याला रोहितचा जोडीदार बनवले जाऊ शकते.

सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. यष्टिरक्षक फलंदाजाला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. ज्यामध्ये संजू सॅमसन आणि ऋषभ पंतच्या रूपाने 2 यष्टीरक्षकांचा समावेश आहे. आता संघ व्यवस्थापन कोणावर विश्वास दाखवते हे पाहायचे आहे. पाचव्या क्रमांकावर शिवम दुबेवर सट्टा खेळू शकते. आयपीएल 2024 मध्ये त्याने 396 धावा केल्या आहेत.

तर रोहित शर्मा रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या 2 अष्टपैलू खेळाडूंना संघात सामील करू शकतो. दोन्ही खेळाडू गोलंदाजीबरोबरच चांगली फलंदाजीही करू शकतात. मात्र, हार्दिकने आयपीएल 2024 मधील कामगिरीने सर्वांची निराशा केली. टीम इंडिया फिरकीपटू म्हणून कुलचा (कुलदीप यादव-युझवेंद्र चहल) जोडीवर अवलंबून राहू शकते. तसेच वेगवान गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती असेल. मोहम्मद सिराज त्याला साथ देऊ शकतात.

टीम इंडियाची अशी काही असू शकते प्लेइंग इलेव्हन …

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन किंवा ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

हेही वाचा :

डॉक्टर! तुम्ही सुद्धा?…….

CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार!

कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ वादातून वृद्ध आईचा मुलाने केला खून