विश्वजीत कदमांनी क्रॉस व्होटिंग केलं? ठाकरेंच्या आमदाराचा संशय

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुती भक्कम राहिली. महाविकास आघाडीत मात्र फूट(politics) पडली. काँग्रेसची सात ते आठ मतं फुटली त्याचा परिणाम शेकापच्या जयंत पाटील यांच्या पराभवात झाला. आता काँग्रेसच्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं याचा अहवाल हायकमांडला पाठवण्यात आला आहे.

आता या आमदारांवर काय कारवाई होणार याबाबत अजून(politics) स्पष्टता नाही. मात्र, या फुटीर आमदारांवरुन महाविकास आघाडीतच कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. भास्कर जाधव यांनी असं वक्तव्य करायला नको होतं अशी खंत थोरात यांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं त्या यादीत मी आमदार विश्वजीत कदम यांचंही नाव पाहिल्यासारखं वाटतंय असे खोचक वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही हेच भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काही काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं हे आम्हाला मान्य आहे. या आमदारांची नावं कळाली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल. परंतु, यामध्ये विश्वजीत कदम यांचं नाव घेणं योग्य होणार नाही. जाधव असं का बोलले हे मला माहिती नाही. त्यांचा हा विषयही नाही, असे स्पष्ट करत बाळासाहेब थोरात यांनी विश्वजीत कदम यांची पाठराखण केली.

या निवडणुकीत काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे कोण आमदार आहेत याची माहिती मात्र समोर आलेली नाहीत. काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावरून मात्र त्यांना कोणते आमदार फुटले याचा अंदाज आल्याचं दिसत आहे. आता या फुटीर आमदारांवर काँग्रेस काय कारवाई करणार, या प्रकारामुळे महाविकास आघाडीतील विश्वास कमी होणार का, या प्रश्नांची उत्तर काय असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

भुजबळांचे आत्मचिंतन आणि त्यांनी घेतलेली पवारांची भेट!

नकारात्मक विचारांनी डोकं होतं खराब? ‘या’ ६ उपायांनी नैराश्य जाईल दूर

मोठी बातमी! चॉकलेटनंतर तुळजाभवानी देवीला विलायची अन् लवंगाचा हार; भाविकांमध्ये संताप