उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (27 सप्टेंबर) एका महिलेने(woman) हल्ला केला होता त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. हल्ला करणारी महिला कोण याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते मात्र आता हल्ला करणारी महिला कोण होती याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची(woman) ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महिलेची ओळख पटवली आहे.
माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करणारी महिला दादरमधील एका सोसायटीतील राहिवासी आहे. या सोसायटीमध्ये देखील महिला चाकू घेऊन फिरते अशी माहिती समोर आली आहे. तसेच ही महिला मेंटली डिस्टर्ब असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही महिला यापूर्वी देखील मंत्रालयात आली होती आणि मला सलमान खानशी लग्न करायचा आहे त्याचा फोन नंबर द्या अशी मागणी करत होती अशी सध्या माहिती समोर आली आहे.
इतकंच नाहीतर ही महिला अनेक राजकीय नेत्यांना फोन करून त्यांच्याकडे सलमान खानच्या नंबरची मागणी करत असते. यापूर्वी देखील तिने भाजपच्या कार्यालयात जाऊन धमकी दिली होती त्यानंतर भाजपकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
हेही वाचा:
निवडणुकीपूर्वीच ईडीकडून काँग्रेस नेत्याची संपत्ती जप्त
कोल्हापुरातील दौऱ्यात अमित शाह महालक्ष्मीचे दर्शन नाही घेणार : मंत्री हसन मुश्रीफ
Airtel ची क्रांती! स्पॅमच्या समस्येवर बसणार आळा