गोड खाण्याची इच्छा कमी करायचीये? मग ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

गोड आपल्या शरीराठी खूप फायदेशीर नसतं. त्याने आपल्याला (sweets)अनेक आजारांची लागण होऊ शकते. पण काहींना रोज गोड खाण्याची सवय असते. काही लोक हे जेवणानंतर गोड खाल्याशिवाय झोपतचं नाहीत. तर काही लोक एकदाच पोट भरेपर्यंत गोड खात असतात. त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आजारांना सामोरं जावं लागू शकतं. ही गोड खाण्याची चव मुळात येतेच कशी? आणि त्यावर उपाय काय? हे आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला सतत गोड खाण्याची चव येत असेल तर सगळ्यात आधी तुम्ही शरीराला आवश्यक असेल तितकं पाणी पित राहणं गरजेचं आहे. तसेच तुमच्या आहारात किंवा तुम्ही फॉलो करत असलेल्या विशिष्ट डाएटमध्ये सुधारणा केली पाहिजे. तुमच्या आहारात फायबर असणं महत्वाचं आहे. त्याने तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळतं आणि बाहेरचे पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही.

तुम्हाला जर दुपारच्या वेळे किंवा रिकाम्या वेळेस गोड खाण्याची (sweets)इच्छा होत असेल तर तुम्ही फळांचे सेवन करू शकता. त्यामध्ये द्राक्षे, बेरीज, डार्क चॉकलेट अशा नॅच्युरल गोड पदार्थांचा समावेश तुम्ही आहारात करू शकता. याने तुमचं वजन वाढण्याचा धोका सुद्धा टळू शकतो. तसचे तुम्ही आहारात कमीत कमी गोड खाण्याचा प्रयत्न करा. एकदा तुम्हाला गोड खाण्याची सवय लागली की, ती काही केल्या सुटत नाही. त्याने तुमच्या हेल्थवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते आतड्यांमधील बॅक्टेरियातील असंतुलनामुळे गोड पदार्थ खाण्याची चव येते. जेव्हा या हानिकारक बॅक्टेरियाची संख्या वाढते तेव्हा गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. यावर उपाय म्हणून तुम्ही फायबर फ्रुट्सचे सेवन करू शकता. त्याने हेल्दी गट मायक्रोबायोमला चालणा मिळते (sweets)आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते.तसेच तुम्ही गोड खाण्याऐवजी गोड फळांचे सेवन करू शकता. त्यामध्ये सफरचंद. नाशपती, केळी, संत्री, किवी फळ, स्ट्रॉबेरी, चिकू, आंबा, टरबूज आणि पेरू यांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. तर WHO च्या मते, दररोज ६ चमचे किंवा त्यापेक्षा कमी साखरेचे सेवन करू तुम्ही करू शकता. त्याने तुम्हाला निरोगी जिवन जगता येईल.

हेही वाचा :

रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठा निर्णय…

कोल्हापूर-सांगली महामार्ग बंद करण्याचा इशारा, राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले

इतका माज येतो कुठून? मद्यधुंद अवस्थेत तरुणाने चौघांना उडवलं Video Viral

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा- तमन्ना भाटिया यांनी रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी; Video Viral

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहणार?