हातकणंगले विधानसभेच्या जागेवरून भाजप पदािधकाऱ्यांचा इशारा…

हातकणंगले : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत(assembly) भाजप कमळ चिन्हावर लढणारा स्थानिक उमेदवार असेल तरच भाजप कार्यकर्ते निवडणुकीत सक्रिय होतील, अन्यथा कुठल्याही उचल्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत, असा इशारा हातकणंगले येथे भाजप पंचायत राज विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला.

यावेळी भाजप नेते डॉ संजय पाटील यांनी(assembly) भूमिका मांडली. ते पाटील म्हणाले, पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवलेले नेतेच विश्वासघात करत आहेत. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला जात आहे. आपण निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचाच प्रचार करू, असेही ते म्हणाले.

पुंडलिक बिरंजे म्हणाले, भाजप मध्ये काही ठिकाणी घराणेशाही चालू असून स्थानिक निष्टावंत कार्यकर्त्याला डावलले जात आहे, त्यामुळे वरीष्ट नेते मंडळींना यात हस्तक्षेप करून निष्टावंत भाजप कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली. या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा संयोजक दिपक रानमाळे, सतिष पाटील, सुनिल पाटील, सयाजी पाटील, विवेक चव्हाण, दिपक ढाले, पुंडलिक बिरंजे, जितेंद्र देसाई, पंकज बुढ्ढे यांच्यासह भाजप पंचायत राज विभागाचे पदाधिकारी उपस्थीत होते.

हातकणंगले तालुक्यात भाजप वाढवण्यासाठी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आहेत. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक मी म्हणजेच भाजप असा अपप्रचार करत आहेत. हे कदापिही खपवून घेणार नाही, असे म्हणत भाजपच्या बैठका या गावात वाड्या वस्त्यांवर होतात. सूतगिरण्यांवर नाही, असे म्हणत सयाजी पाटील यांनी चांगलाच घरचा आहेर दिला.

दीपक ढाले बोलताना म्हणाले, हातकणंगले विधानसभा मतदारसंघात वारंवार भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे. उचल्या उमेदवार देऊन येतील स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे स्थानिक व कमळ चिन्हावर लढणारा उमेदवारा असेल तरच भाजप कार्यकर्ते सक्रिय होतील, अन्यथा तटस्थ राहतील, असेही ते म्हणाले. इचलकरंजी मतदार संघात इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे.

हेही वाचा:

केंद्राचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; शेतकऱ्यांचं होणार भलं

सिद्धांत- मालविकाची रोमँटिक केमिस्ट्री, ‘युध्रा’चे पहिले धमाकेदार गाणे प्रदर्शित

ऐन गणेशोत्सवात लालपरीची चाके थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून आंदोलनाचा इशारा