शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार(political news) यांनी दिल्लीतील निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे. अशातच यासंदर्भात रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी मोठं देखील वक्तव्य केलं आहे.मात्र यावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल म्हणजेच 12 डिसेंबरला शरद पवार(political news) यांचा वाढदिवस होता, त्यामुळे सर्वजण कुटुंब म्हणून एकत्र येणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. परंतु सुनंदा पवार या नेमक्या कोणत्या संदर्भानं म्हटल्या आहेत. तसेच दोन्ही पवारांनी कुटुंब म्हणून एकत्र यायला हवं की राजकारणात एकत्र यायला हवं? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, राजकारण म्हणून एकत्रित यायला हव असेल तर अजित पवार यांच्या संगतीत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोक आहेत ते माळशिरस येथील मारकडवाडीत जाऊन शरद पवार साहेबांबद्दल कमालीचे अपशब्द वापरतात त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय भूमिका आहे?
तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील महिला आयोगावर असणाऱ्या बाई टीका करत असताना अत्यंत बिकट हास्य करत होत्या, हे मात्र सगळं चीड आणणारं आहे. तसेच या लोकांबद्दल नेमकी भूमिका काय आहे? त्यामुळे सुनंदा पवार जर दोन्ही पवारांनी राजकारणात एकत्र आलं पाहिजे असं म्हणत असतील तर त्याचा महाविकास आघाडीवर मक्कीच परिणाम होईल. तसेच त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता होणं फार स्वाभाविक आहे, असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
हेही वाचा :
रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार!
डॉक्टरचाच विवाहित महिलेवर अत्याचार उपचारासाठी रुममध्ये नेलं अन्
शरद पवार, अजितदादा पुन्हा एकत्र येणार का? शरद पवार गटाच्या बड्या नेत्यानं सांगितली आतली गोष्ट