कोल्हापूर जिल्ह्यातील अकीवाट (ता. शिरोळ) येथील ऑगस्ट महिन्यातील महापुरात एक ट्रॅक्टर(Tractor) अपघातात वाहून गेल्याची घटना घडली होती. यात इकबाल बाबासो बैरागदार (वय 56) हे देखील वाहून गेले होते. दरम्यान या घटनेनंतर यांच्या मृतदेहाचे अवशेष कर्नाटकातील इंगळी (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे कृष्णा नदीच्या पात्रात सापडला आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल, सुपारीच्या डब्याने आणि कपड्यांवरील खुणांवरून त्यांची ओळख पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट 2024 रोजी बैरागदार आणि त्यांचे सहकारी ट्रॅक्टरने बस्तवाड शेताकडे जात असताना पुलावरून ट्रॅक्टर(Tractor) नदीत कोसळला होता. या अपघातात चार जण बचावले, तर सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आण्णासाहेब हसुरे आणि इकबाल बैरागदार वाहून गेले होते. हसुरे यांचा मृतदेह तीन दिवसांत सापडला, मात्र बैरागदार यांचा शोध लागला नव्हता.
शासनाने शोधमोहीम थांबवल्यानंतर बैरागदार यांचे नातेवाईक खचले नाहीत. त्यांनी चार महिन्यांपासून कृष्णा नदीकाठावर पत्रके वाटणे, प्रसिद्धीमाध्यमांतून माहिती देणे, आणि चौकशी करणे असे प्रयत्न सुरू ठेवले. मंगळवारी इंगळी येथे मृतदेहाचे अवशेष सापडल्याचे समजताच नातेवाईकांनी ओळख पटवली. अशातच आता बैरागदार यांच्या मृतदेहावर अकिवाट येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा :
‘पुष्पा 2’ पाहायला गेला आणि चांगलाच फसला, सिनेमागृहात एकच थरार
“‘या’ अभिनेत्याचा धाडसी स्टंट: जळते मेण चेहऱ्यावर ओतले, पाहा व्हायरल व्हिडीओ”
गौतम अदानी यांची मोठी डील; या क्षेत्रात केलीये धमाकेदार एन्ट्री, 400 कोटींमध्ये झालाय व्यवहार