श्वानांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवत होता वाॅचमॅन; डॉग लव्हरने येऊन त्यांनाच दिला चोप; Video Viral

भटक्या कुत्र्यांचे प्रमाण आजकाल फार वाढले आहे, विशेष करून रात्रीच्या वेळी तर जणू सर्वत्र त्यांचेच राज्य असते. अशात त्यांना रस्त्यावर कोणी फिरताना दिसले की लगेच कुत्र्यांची टोळी त्यांच्यावर हल्ला करते. सध्या या संबंधीचाच एक व्हिडिओ सोशल मीडिया सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे ज्यात एका श्वानांच्या टोळीने वाॅचमॅनवर हल्ला(attack) चढवल्याचे दिसते. विशेष म्हणजे यावेळी वाॅचमॅन आपला बचाव करण्यासाठी त्यांच्या हातात असलेल्या काठीचा वापर करतात मात्र तितक्यातच एक डॉग लव्हर पळत येतो आणि त्यांना वाचवायचे सोडून उलटा त्यांच्यावरच हल्ला करतो.

ही घटना मुंबईमध्ये घडल्याची माहिती आहे. येथे एका वाॅचमॅनला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक वाॅचमॅन कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तेव्हा अचानक एक डॉग लव्हर अचानक तेथे येतो आणि वाॅचमॅनला मारहाण करू लागतो. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता तो चांगलाच व्हायरल होत आहे.

हे प्रकरण मुंबईच्या अंधेरी पूर्व येथील वास्तु रिद्धी पंप हाऊसचे आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक वाॅचमॅन हातात लांब काठी घेऊन उभा दिसत आहे. तेव्हा अचानक रस्त्यावरील कुत्र्यांचा एक गट भुंकतो(attack) आणि त्याच्यावर हल्ला करतो. बचावासाठी वाॅचमॅन आपली काठी कुत्र्यांकडे हलवतो. इतक्यात एक तरुण वेगाने धावत येतो आणि त्याला चापट मारायला लागतो. वाॅचमॅन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण तो तरुण त्याला मारहाण करत राहतो. यातच वाॅचमॅन जमिनीवर पडतो. हल्ल्यादरम्यान काही कुत्र्यांनी वाॅचमॅनला चावा घेतल्याचे समजत आहे. यानंतर सोसायटीतील इतर लोक येतात आणि कुत्र्यांना तेथून हाकलवून काढतात.

हा संपूर्ण प्रकार धक्कादायक असून याचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अंधेरी, मुंबई येथे कुत्र्यांच्या हल्ल्यापासून बचाव करणाऱ्या एका व्यक्तीने निष्पाप वॉचमनला मारहाण केली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांना भटक्या कुत्र्यांची खूप काळजी आहे पण माणसांची नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बावळट लोकांचे लक्षण”.

हेही वाचा :

होळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गूडन्यूज, महागाई भत्ता वाढणार

पैशांचा पाऊस पाडणाऱ्यांचा ग्रामस्थांनी उधळला डाव, अघोऱ्यांचा ‘रात्रीस खेळ’, जिवंत व्यक्तीला कपड्यात बांधून…. 

सलमान आणि शाहरुख खानचा मृत्यू??? ‘त्या’ व्यक्तीच्या दाव्याने सिनेसृष्टीत एकच खळबळ