तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी वरदान! होतील ‘या’ समस्या दूर

आजकाल सगळेच आपल्या आरोग्याकडे(health) लक्ष देत आहेत. हेल्दी राहण्यासाठी अनेक गोष्टींचा अवलंब केला जातो. कोणी व्यायामाकडे वळलं आहे तर कोणी हेल्दी आहाराकडे लक्ष देत आहे. यासोबतच बाकीच्या अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात.

तुम्ही अनेकदा आपल्या कुटुंबातील मोठ्या ज्येष्ठांना सांगताना ऐकलं असेल की तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते. खरंतर आयुर्वेदानुसार(health) तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्याला फायदेशीर ठरते. जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याच्या फायद्यांविषयी माहिती नसेल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात काय फायदे मिळतात.

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा. रात्रभर पाणी तांब्याच्या संपर्कात आल्याने त्याचे काही कण पाण्यात विरघळतात. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यास शरीराला अनेक प्रकारेचे फायदे होतात.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
आजकालच्या बिघडलेल्या लाइफस्टाईमुळे लोकांना खाण्याच्या चुकीच्या सवयी लागल्या आहेय. अतिप्रमाणत फास्ट फूड किंवा वेगवगेळी पेय यामुळे वजन वेगाने वाढत आहे. जर तुमचेही वजन वाढले असेल तर तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास सुरुवात करा. या पाण्यामुळे आपल्या शरीरातील चयापचय गती वाढवण्यास मदत होते. तांब्याचे पाणी पचनक्रिया सुधारते ज्यामुळे शरीरात साठलेली चरबी सहज कमी होऊ लागते आणि वजन कमी होते.

सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे ज्यामुळे संधिवात असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो.

हाय ब्लडप्रेशरवर फायदेशीर
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. एवढचं नाही तर यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो आणि हाय ब्लडप्रेशरची समस्याही दूर होते. त्यामुळे हे पाणी पिणे हे तुम्ही दररोज सकाळच्या दिनचर्येचा भाग बनवू शकता.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात उत्तम
जर तुम्ही सारखे आजारी पडत असाल तरीही तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आवर्जून प्या. हे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामुळे आजारी पडण्याची वारंवारता कमी होते.

हे लक्षात घ्या की तांब्याच्या भांड्यात शेवाळ येऊ शकते. त्यामुळे रेगुलर बेसेस तांब्याच्या भांड्याला आवर्जून घासा.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

हेही वाचा:

गुलीगत सूरज चव्हाणच्या ‘राजा राणी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणीनेच केली तरुणीची हत्या; चाकूने हल्ला केला अन्…

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन: देशासह उद्योगविश्वावर शोककळा पसरली