महासत्ता चौकाच्या पुढील बाजूस स्पीड ब्रेकर(accident) नंतर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. थोडा पाऊस झाला तरी पाणी रस्त्यावर साचून राहते, कारण साईडला असलेल्या फुटपाथमुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा उपलब्ध नाही.
स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये या ठिकाणी पाच ते सहा अपघात(accident) घडले आहेत. विशेषतः सायंकाळच्या वेळी, जेव्हा शाळा सुटतात, तेव्हा या रस्त्यावर खूप गर्दी असते, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते.
या परिस्थितीबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अपघातांसाठी जबाबदार कोण, असा सवाल जनतेतून केला जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, त्वरित येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी एक छोटीशी चर काढून पाणी बाहेर काढावे, जेणेकरून अपघात टाळता येतील आणि नागरिकांचा जीवाला धोकाही कमी होईल.
हेही वाचा :
रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना: नितीन गडकरींची मोठी घोषणा
“लाडका यंत्रमागधारक” योजना त्वरित जाहीर करावी – विनय महाजन यांची राज्य सरकारकडे मागणी
सज्ज व्हा! शिवसेनेचा वाघ परत येतोय… ‘धर्मवीर 2’ची नवीन रिलीज डेट जाहीर