‘हे सांगून सांगून आम्ही थकलोय,एकनाथ शिंदे नाराज नाहीत..’ नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले..

विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत महायुतीनं राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आधीच (angry)नाराजीची चर्चा असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी पण कोणाला कुठलं मंत्रीपद मिळणार मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार हे गुलदस्त्यात असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहे. यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. शिंदे साहेब नाराज नाहीत. हे सांगून सांगून आम्ही थकलोय. सरकार स्थापन झाले आहे. तिनही नेते मंत्रीमंडळ सांभाळायला सक्षम आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रीमंडळ विस्तार होईल असं वक्तव्य केलंय. हे सांगत त्यांनी EVM वर चाललेल्या गोंधळावरही विरोधकांना सुनावलंय.

राज्यात सध्या महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर EVM वरून आरोप प्रत्योरोप होत आहेत. यावरून आमदार उदय सामंत यांनी विरोधकांवर टोलेबाजी केलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर ते म्हणाले, एकीकडे EVM च्या नावावर बोंबाबोंब करायची ही दुसरीकडे लोकांची माथी भडकवायची हा विरोधकांचा डाव आहे. ही भूमिका महाराष्ट्राला समजली म्हणून ते 40-50 वर आले. नियम लावताना खासदारकीला एक आाणि विधानसभेला एक नियम. इतर ठिकाणी EVM चांगलं होतं आता वाईट(angry) आहे. असं म्हणत शिंदेगटाचे आमदार उदय सामंत यांनी पवारांवर टीका केली.

EVM विरोधी वातावरण निर्माण करण्यापेक्षा जे अपयश आलं आहे ते झाकण्याचा हा प्रयत्न आहे. जिंकून आले ते मतदान पण इव्हीएमवर झाले. असा टोला काँग्रेसनेते राहूल गांधींना त्यांनी लगावला. राहुल गांधीवर प्रयत्न करुन बघितला तो यशस्वी झाला नाही. म्हणून आता ममता दिदिंवर प्रयोग करुन बघत आहेत. काँग्रेसने विचार करावा की त्यांच्यावर शंका निर्माण होत आहे. असंही ते म्हणाले..

राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. सरकार स्थापन झालं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आठवडाभरात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिपदांचा फॉर्म्युला आणि खात्यांच्या वाटप, यासाठी महायुतीतील नेत्यांना आणि पक्षांना तारेवरती कसरत करावी लागणार आहे. याआधी देखील मंत्रीपदासाठी आस लावून बसलेल्या नेत्यांचा देखील विचार यावेळी करावा लागणार आहे.

हेही वाचा :

Shocking Video: बापरे! डान्स करताना अचानक स्टेजवर कोसळली

अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैद

शिंदेंना गृहखात्यावर पाणी सोडावं लागणार?, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण