मुंबई: मराठा आरक्षणाच्या (reservation)मागणीवर ठाम राहून समाजाच्या हक्कासाठी अखेरचा श्वास घेईपर्यंत संघर्ष करू, असा ठाम निर्धार मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. सरकारवर दबाव वाढवताना त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले.
जरांगे-पाटील म्हणाले, “मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या हक्कांसाठी लढतोय, पण केवळ आश्वासनं देऊन आम्हाला थकवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता फसवणूक खपवून घेतली जाणार नाही.”
सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा तातडीने सोडवावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. “आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही. सरकारने निर्णय घेण्यासाठी वेळ वाढवत राहिल्यास लोकांमध्ये असंतोष वाढेल आणि त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल,” असे जरांगे-पाटील यांनी ठामपणे सांगितले.
त्यांनी मराठा समाजाला शांतता आणि एकजूट राखण्याचे आवाहन करत सांगितले की, “हा लढा केवळ आमच्या हक्कांचा आहे आणि तो अहिंसात्मक पद्धतीने लढला जाईल. सरकारला आता वेळकाढूपणा परवडणार नाही.”
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास, पुन्हा आंदोलनाची दिशा तीव्र केली जाईल आणि यावेळी तो लढा निर्णायक ठरेल, असेही मनोज जरांगे-पाटील यांनी सूचित केले
हेही वाचा:
‘क्या चोर बनेगा रे तू’, चोरी करायला गेला अन् असे काही झाले की…Video
एका दिवसात 5 कप चहा पिण्याने काय होते?
खळबळजनक! नवनीत राणांना पुन्हा धमकीचे पत्र, तीन दिवसांत दुसर्यांदा धमकी