वजन आणि वयाचा मुद्दा भिडला; तरुणी आणि महिलेत मेट्रोत जोरदार भांडण, Video Viral

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी स्टंट, तर कधी जुगाड, तर कधी धक्कादायक असे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. भांडणांचे तर अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात. कधी मेट्रोत(metro) तर कधी बसमध्ये तर कधी रस्त्यांवर कुठे ना कुठे भांडणे सुरु असतात. या भांडणांमध्ये पुरुष आणि महिलांचाही समावेश असतो. सध्या असाच एक महिलांच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तुम्हाला माहितच असेल, मुलींना किंवा महिलांना त्यांचे वय, वजन विचारु नये असे म्हटले जाते. अनेकदा यामुळे मोठे वाद निर्माण होतात. असाच वाद या महिलांमध्ये झाला आहे. एक 20 वर्षाची तरुणी मेट्रोत(metro) फोनवर मोट्या आवाजात बोलत होती. ती कोणाला तरी शिवीगाळ करत होती. याचदरम्यान मेट्रोतील एक महिला तिच्या आवाजाने त्रस्त झाली आणि तिला सुनावू लागली.

यावेळी महिलेने तीच्या बजनावर कमेंट पास केली यामुळे तरुणीला राग आला आणि तिने तिच्या वयावर कमेंट पास केली. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, दोघी एकमेकींना मारण्याची धमकी देऊ लागल्या. तरुणीने महिलेला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याने महिला चवताळली आणि तरुणीला जाडे म्हणू लागल्या. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत असून दिल्ली मेट्रोतील असल्याचे म्हटले जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने, काका विधायक आहेत दिदींचे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने हे रोजचं झालंय असे म्हटले आहे. एका युजरने WWE फाईट मेट्रोमध्ये, काहीपण म्हणा बघायला मजा येते. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

घरच्या घरी ‘हे’ हर्बल टी ट्राय केल्यास Period Craps होतील दूर…

बाळाला श्वास घ्यायला त्रास, भोंदूबाबाने गरम विळ्याचे दिले ६५ चटके; प्रकृती गंभीर

घटस्फोटापूर्वी चहलला धनश्रीबद्दल कळले होते सत्य जगासमोर व्यक्त केले आपले दुःख