‘बरं झालं करिश्मा कपूरशी लग्न झालं नाही! करीना किमान…’ सैफ अली खानचं मोठं विधान

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर या बहिणी नेहमीच कोणत्या ना कोणत्या(married) कारणामुळे चर्चेत असतात. करीना आणि सैफ अली खान यांची जोडी चाहत्यांची आवडत्या सेलिब्रिटी कपल्सपैकी एक आहे. दरम्यान, तुम्हाला माहितीये का सैफ अली खाननं अनेकदा करीनाला म्हटले की बरं झालं मी करिश्माशी नाही तर तुझ्याशी लग्न केलं. नक्की सैफ असं का म्हणाला याविषयी आपण जाणून घेऊया…

सैफचं करिश्मासोबत किती चांगलं बॉन्ड आहे हे सगळ्यांना(married) माहित आहे. पण मग सैफ करीनाला असं का म्हणाला की बरं झालं त्यानं करिश्माशी नाही तर तिच्याशी लग्न केलं. करीनानं नुकतीच द वीकला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत करीनानं सांगितलं की एसीच्या तापमानावरून त्यांच्यात भांडणं होतात.

सैफला नेहमी गरम होतं असतं त्यामुळे तो एसीचं तापमान हे 16 डिग्री सेल्सियस ठेवतो, तर करीनाला 20 डिग्री सेल्सियस हे तापमान योग्य वाटतं. करीनाच्या म्हणण्यानुसार, सैफ बऱ्याचवेळा मस्करीत म्हणाला की काही कपल्सचं एसीच्या तापमानवर मतभेद झाल्यामुळे घटस्फोट देखील झाले आहेत.

करीना म्हणाली, ‘आम्ही नक्कीच AC च्या तापमानावरून भांडतो कारण सैफला 16 डिग्री तापमान लागतं कारण त्याला गरम होतं आणि मला 20 डिग्री तापमान योग्य वाटतं. त्यामुळे आम्ही 19 डिग्री तापमानावर AC ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ते इतकं काही वाईट नाही.’

पुढे करिश्माचा उल्लेख करत करीना म्हणाली की ‘तिला 25 डिग्री तापमान लागतं. जेव्हा कधी करिश्मा घरी जेवायला येते, तेव्हा लगेच ती AC चं तापमान 25 डिग्री करते. त्यावेळी सैफला फार गरम होतं असतं. त्यावर सैफ काय बोलतो हे सांगत करीना पुढे म्हणाली, देवा! बरं झालं, मी बेबोशी लग्न केलं कारण कमीत कमी ती AC तापमान 19 डिग्री ठेवायला तरी तयार होते.’

दरम्यान, सैफनं करीना कपूर आणि करिश्मा कपूरसोबत केलेल्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं करीनासोबत ‘कुर्बान’, ‘एजंट विनोद’ आणि इतर काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर करिश्मा कपूरसोबक ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात काम केलं आहे.

हेही वाचा :

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज तिसरा दिवस

अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; ‘पंचगंगेने’ इशारा पातळी ओलांडली

‘महिन्यातून 2 ते 3 वेळा तरी मी बॉयफ्रेंडसोबत…’, Janhvi Kapoor चा धक्कादायक खुलासा