रॉस्टन चेजच्या वादळामुळे वाचली वेस्ट इंडिजला, मिळवला ५ विकेटनी विजय

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट (succes)इंडिजने पापुआ न्यू गिनीला ५ विकेटनी हरवले. शेवटच्या ओव्हर्समध्ये आंद्रे रसेल आणि रॉस्टन चेजने आपल्या संघाला संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला.

पापुआ न्यू गिनीने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत १३६ धावा केल्या होत्या. यात सेसे बाऊच्या ४३ बॉलमध्ये ५० धावांच्या खेळीचा समावेश होता. किप्लिन डोरिगाने शेवटच्या ओव्हर्समध्ये १८ बॉलमध्ये २७ धावांची खेळी केली.

खरंतर हे आव्हान वेस्ट इंडिज संघासाठी तितके मोठे नव्हते. मात्र त्यांच्यासाठी पहिली १५ षटके अधिक संघर्षपूर्ण राहिली. मात्र १८व्या षटकांत १८ धावांनी सामन्याचे चित्रच बदलले. पापुआ न्यू गिनीसाठी (succes)कर्णधार असदवालाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.

१३७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्याच षटांत जॉनसन चार्ल्सची विकेट गमावली. तो आपल्या पदार्पणाच्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार ठरला. दुसऱ्या ओव्हरमध्ये निकोलस पूरन बचावला. पूरनने २७ बॉलमध्ये २७ धावा केल्या. मात्र मोठा शॉट खेळण्याच्या नादात तो बाद झाला. काही वेळानंतर पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असदवालाने ब्रँडन किंगला ३४ धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार रोवमन पॉवेल क्रीझवर आला, मात्र तोही मोठा शॉट खेळण्याच्या नादात बाद झाला. पावेलने १५ धावा केल्या. १५ षटकांत वेस्ट इंडिजने ४ विकेट गमावत ९४ धावा केल्या होत्या. शेवटच्या पाच षटकांत ४३ धावा हव्या होत्या. त्याचवेळी शेरफान रदरफोर्ड २ धावा करून बाद झाला.

संघाला शेवटच्या ३ षटकांत ३१ धावांची गरज होती. मात्र १८व्या षटकांत १८ धावा काढत वेस्ट इंडिजने आपला विजय सुरक्षित केला.

हेही वाचा :

शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा महामार्गाचे काम कोल्हापुरात पाडले बंद

उद्यापासून इचलकरंजीसह २१ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर

धोनी या दिवशी घेणार निवृत्ती, BCCIही रोखू शकणार नाही- दिग्गजाचा दावा