आम्ही काय ऐकतोय…!ते खरं हाय का………..?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी :

कसं काय पाटील बर हाय का? काल काय (popular)ऐकलं ते खरं हाय का? पन्नास वर्षांपूर्वीच्या एका चित्रपटातील हे लावणी गीत आजही तितकंच लोकप्रिय आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सध्याच्या राजकीय अवस्थेला सुसंगत असे हे गीत आहे. त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते”आम्ही काय ऐकतोय ते खरं हाय का ?”
असा प्रश्न त्यांना विचारू लागले आहेत. आणि”माझी काय गॅरंटी नाही”असं उत्तर देऊन जयंत पाटील हे कसं काय पाटील बरं हाय का या चित्रपटाचा क्लायमॅक्स वाढवत आहेत.काही दिवसांपूर्वी ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या निवासस्थानी अचानक भेटले. त्यांच्या तर तासभर चर्चा झाली. पण मतदारसंघातील काही महसुली प्रश्न मांडण्यासाठी मी त्यांना भेटलो असा तेव्हा त्यांनी खुलासा केला होता.

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत किंवा ते अजितदादांच्या राष्ट्रवादी मध्ये जातील अशा आशयाच्या बातम्या अजून मधून चर्चेत यायच्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक मंत्रीपद राखीव ठेवले अशा बातम्याही मीडियात यायच्या. विशेष म्हणजे अजूनही शिल्लक असलेले मंत्रिपद फडणवीस यांनी भरलेले नाही. एकूणच त्यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले आहे आणि त्याचाच संदर्भ देत ते गावाकडच्या कार्यक्रमात बोलताना”आता माझी गॅरंटी मी देत नाही”असे सांगून सर्वांनाच त्यांनी बुचकळ्याचा टाकलं होतं.

आता माझं मन राजकारणात रमत नाही. सत्ता नसताना पक्ष चालवणं कठीण जात आहे. काही बोलायची सुद्धा चोरी झाली आहे. अशी खंत जयंत पाटील यांनी हसणं मुस्लीम यांच्याजवळ बोलताना व्यक्त केली होती. या एकूण पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये (popular)अजित दादा पवार यांची भेट घेतली. या दोघांचे बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. त्याच दरम्यान शरद पवार यांचीही इन्स्टिट्यूट मध्ये एन्ट्री झाली.शरद पवार हे अजितदादा पवार यांच्याकडे एक कटाक्ष टाकत पुढच्या दालनात निघून गेले. जयंत पाटील आणि आजीचा दादा यांच्यात राजकीय चर्चाच झाली नाही असे ठामपणे म्हणता येणार नाही. पण राजकीय चर्चा झाली नाही असा खुलासा दादांनी केला आहे. साखर उद्योगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि ए आय या नवीन तंत्रज्ञानाबद्दल विचार करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती असेही दादा यांनी म्हटले आहे.

पण संजय राऊत यांनी या दोघांच्या भेटीबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्यांना अधून मधून भेटण्यासाठी कधी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर कधी रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत. या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये विनाकारण संशयाचे वातावरण तयार करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.जयंत पाटील हे अनुभवी राजकारणी आहेत. राजकारणाचे धडे त्यांना घरातूनच मिळालेले आहेत. राजकारणात आल्यापासून ते कायम सत्तेत राहिले आहेत. गेल्या अडीच तीन वर्षापासून मात्र ते सत्तेतून बाहेर आहेत. आणि आता ते सत्ता नसताना पक्ष कसा चालवायचा असे म्हणू लागले आहेत. एकूणच ते अस्वस्थ आहेत. गोंधळात टाकणारी, संभ्रम निर्माण करणारी विधाने करून त्यांनी आपली राजकीय अस्वस्थता अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केली आहे. त्यातच शरद पवार गटात रोहित पवारांशी त्यांचे काही जमत नाही.

रोहित पवार यांना प्रत्यक्ष अध्यक्ष हवे आहे.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा जयंत पाटील यांच्या विषयी अशीच चर्चा ऐकायला मिळायची. पण तेव्हा त्यांनी एक दोन वेळा मी शरद पवार यांना सोडून अन्य कुठेही जाणार नाही असा सुस्पष्ट शब्दात खुलासा केला होता. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र जयंत पाटील हे स्वतःच स्वतःच्या भोवती संशयाचे वातावरण तयार करताना दिसू लागले आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये एक मंत्रीपद शिल्लक आहे आणि आता तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे दोन मंत्री पदे शिल्लक आहेत.त्यामुळे जयंत पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला तर त्यांची मंत्रीपदी निश्चित निवड होणार आहे.

राजकारणात किंवा लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी (popular)विरोधकांचा सत्ताधाऱ्यांशी संवाद असणे यात काही गैर नाही. उलट सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अशा प्रकारचा सुसंवाद असणे गरजेचे आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी आधी चंद्रशेखर बावनकुळे आणि आता काल-परवा अजितदादा पवारयांची भेट घेणे किंवा विधान सभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडून सत्कार स्वीकारणे कडून सत्कार स्वीकारणे गैर आहे असे म्हणता येणार नाही पण तरीही राजकारणात कोणाचीच गॅरंटी देता येत नाही एवढे मात्र खरे. पण कसं काय पाटील बर हाय का? आम्ही काय ऐकतोय ते खरं हाय का? काल म्हण तुम्ही दादांना भेटलात! भेटीत काय झालं सांगणार काय? तुतारी पेक्षा गड्या, घड्याळ बर हाय का? असा त्यांना त्यांचाच कार्यकर्ता प्रश्न विचारू शकतो.

हेही वाचा :

51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा

सिनेस्टाईल अपहरण प्रकरणी मोठी अपडेट नवऱ्याने बायकोसोबत भयकंर कृत्य का केलं

सासऱ्याला सूनेच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं त्यानंतर दोघांमध्ये शेतात जे घडलं