कालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाठांचं टेन्शन वाढलं?

संभाजीनगरमध्ये विधानसभा (assembly)निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांबद्दल अपशब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे आमदार तसेच औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे शिंदेंच्याच पक्षाचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. कालीचरण यांनी जे विधान केलं तो कार्यक्रम शिरसाठांनी आयोजित केल्याच्या बातम्यांचं त्यांनी स्वत: खंडन करताना आपला या कार्यक्रमाशी कोणत्याच प्रकारे काहीही संबंध नसल्याचं शिरसाठ म्हणाले आहेत. मात्र अनेक उमेदवारांना घाम फोडणारं असं काय विधान कालीचरण महाराजांनी केलं होतं? जाणून घेऊयात…

कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे पाटलांचा उल्लेख ‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’ असा केला होता. ‘मनोज जारांगे हा हिंदुत्व तोडणार राक्षस आहे,’ असं कालीचरण महाराज म्हणाले होते. पेट्रोल, दरवाढ, भाववाढीवर मतदान केल्यास हिंदू राजा सत्तेत कसा बसेल? असा सवाल कालीचरण महाराजांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना केला होता. मुस्लिम मौलवींच्या सांगण्यावरून मतदान करतात, त्यामुळे तुम्ही हिंदू हितांसंदर्भात बोलणाऱ्यांनाच मतदान करावं असं आवाहन कालीचरण यांनी केलं होतं.

कालीचरण यांनी जरांगेंबद्दल वादग्रस्त विधान केल्याने मराठा समाजामधून संताप व्यक्त केला जात आहे. ऐन निवडणुकीच्या(assembly)तोंडावर मराठा समाजाची नाराजी महागात पडू शकते याचा अंदाज असल्याने आज सकाळीच संजय शिरसाठ जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवली सराटीला दाखल झाले आहेत. दरम्यान आता या दोघांमध्ये काय चर्चा होते आणि दोघांपैकी कोणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याच प्रकरणाबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमवारी संजय शिरसाठ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. “काल माझ्या मतदारसंघामध्ये कालिचरण महाराजांची जी सभा झाली त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. ना मी त्यांना भेटलोय, ना त्यांच्या सभेला उपस्थित राहिलो आहे. ना माझं कुठे बॅनर आहे. अशी जेव्हा बातमी येते तेव्हा लोकांमध्ये गैरसमज पसरतो. जरांगे पाटील आणि आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतो हे तुम्ही पाहिलं असेल,” असं शिरसाठ म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “मराठा समाजामध्ये गैरसमज झाला की मी हे काहीतरी घडवतोय तर त्याचा परिणाम वाईट होतो याची जाणीव मला आहे. या प्रकरणानंतर बातमी अशी लागली की संजय शिरसाटांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे विधान करण्यात आलं. पण मी स्पष्ट करु इच्छितो की असा कोणताही कार्यक्रम मी आयोजित केलेला नव्हता. माझ्या त्याच्याशी काहीही संबंध नाही आणि जरांगे पाटलांबद्दल आम्हाला आदर आहे,” असं शिरसाठ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा :

‘फडणवीसांचा महाराष्ट्र धर्माशीच द्रोह, मोदी-शहांनी उघडपणे

Voter ID नसेल तर ‘या’ 12 पैकी कोणताही 1 पुरावा दाखवून करता येईल मतदान

प्रचारतोफा थंडावताच भाजप-ठाकरे गटात जोरदार राडा