केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून(Union) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत म्हटले आहे की, महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे समर्थन केले आणि महाराष्ट्राला मिळालेल्या निधीची यादी जाहीर केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधकांची प्रतिक्रिया आधीच ठरलेली आहे. मी आकडे सांगतोय(Union)म्हणून ते उत्तर देऊ शकत नाहीत. ते फक्त नरेटिव्ह सेट करतात. पी चिदंबरम यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सकाळीच ठरवले होते की काय बोलायचे आहे. विजय वड्डेटीवार यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांना माहित आहे की आपण सत्तेत येणार नाही. आमचा अर्थसंकल्प वड्डेटीवारांनाही आवडला आहे.”
फडणवीस पुढे म्हणाले, “यंदा संतुलित अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. कोव्हिडनंतर जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडत होती. त्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेने दाखवलेली 8.2 टक्के वाढ भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद दाखवणारी आहे. उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाली. सामाजिक कल्याणासाठीच्या योजनांसाठी 12 टक्के अधिकची गुंतवणूक आहे. जीडीपीच्या 7.8 टक्के गुंतवणूक झाली आहे. बँकांचे NPA केवळ 2 टक्क्यांवर आहे.”
फडणवीस यांनी महाराष्ट्राला केंद्रीय अर्थसंकल्पातून मिळालेल्या निधीची यादी जाहीर केली:
- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
- MUTP-3 : 908 कोटी
- मुंबई मेट्रो: 1087 कोटी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
- नागपूर मेट्रो: 683 कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
- पुणे मेट्रो: 814 कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी
अर्थसंकल्पावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादात नागरिकांचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसात या वादाची परिणीती काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
अर्थसंकल्पानंतर शिंदे सरकारचे 6 धडाकेबाज निर्णय!
टोमॅटोने मोडले सफरचंदाचे रेकॉर्ड, गृहिणींनो आता बेतानेच वापरा टोमॅटो, एक किलो तब्बल…
यशोदा पुल बांधकामातील संथ गतीचा फटका नागरिकांना: जबाबदार कोण?