मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला(accused) आज शुक्रवारी प्रयागराजवरुन छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर खोक्याला शिरुर-कासार येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. या सुनावणीअंती न्यायालयानं खोक्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता २० मार्चपर्यंत खोक्याचा मुक्काम पोलीस कोठडीत असेल. यावेळी सतीश भोसले याच्या वकिलांनीही आपली बाजू मांडली.

सतीश भोसले हा बीडमधील जातीय राजकारणाचा बळी ठरला आहे. आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसलेवर काढला जात आहे. सतीश भोसले हा एका आमदाराचा कार्यकर्ता आहे. तो पारधी समाजाचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात आहे. एखाद्या मागासवर्गीयाने (accused)आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का? बीडमध्ये सध्या जे काही जातीचं राजकारण सुरू आहे त्याचा सतीश भोसले हा बळी ठरला आहे, असे खोक्या भाईचे वकील अंकुश कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, आता पुढच्या सुनावणीला पोलीस कोर्टात काय माहिती देणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून यात या आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग आहे
मारहाण करताना कुऱ्हाड आणि सत्तुर जप्त करायची आहे. त्यासाठी आरोपीची आम्हाला पोलीस कोठडी पाहिजेअटक करण्यात आलेल्या आरोपीचे इतर गुन्हेगारांशी काही संबंध आहेत का? हे तपासायचं आहे
सदर गुन्हा हा शारीरिक आणि गंभीर स्वरूपाचा असून सदर गुन्ह्यात आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची तक्रार असल्याने पुण्यामध्ये वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कार (accused) तपासणी कामी जप्त करायची आहे सदर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यातील सर्व आरोपी फरार आहेत
यातील आरोपी फरार असताना त्याला फरार होण्यासाठी कोणी कोणी मदत केली? याचा तपास करायचा आहेयाव्यतिरिक्त नमूद गुन्ह्यात आरोपीच्या सहभागाची सखोल चौकशी करायची आहे म्हणून पोलीस कोठडी हवी आहे
आम्हाला पोलिसांची कायदेशीर चौकशी मान्य आहे. पण बुलडोझरने आमचं घर पाडणं योग्य नव्हतं. आमचं घर पाडल्यानंतर चार ते पाच दिवसांनी ते पेटवून देण्यात आल्याची बातमी आली. त्यामुळे आम्ही आज इतक्या तात्काळ शिरु-कासारा गावात आलो. घर पेटवून देताना घरातील लहान मुलींनाही मारण्यात आलं. त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सतीश भोसलेच्या बहिणीने केलीय .
हेही वाचा :
ठाकरे गटाला धक्का ! ‘या’ फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उन्हाळ्यात काकडीचा रायता खाताय? तर ‘ही’ बातमी वाचाच
परीक्षेसाठी पत्नी बाहेरगावी गेल्यावर पतीने मेव्हणीसोबत केलं लग्न; नंतर बायकोला व्हिडिओ कॉल केला अन्…
आमिर खान एका लेकराच्या आईच्या प्रेमात, तिसऱ्यांदा करणार निकाह?
ट्रिपल सीट अन् नियमांची पायमल्ली; भर रस्त्यात तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, Video Viral