युट्यूबर अरमान मलिक हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमची(married) चर्चेत असतो. दरम्यान, अरमान हा तिसरं लग्न करणार असं त्याची पहिली पत्नी पायल मलिकचं म्हणणं होतं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ती याविषयी बोलताना दिसते. नक्की काय झालं ते जाणून घेऊया…
खरंतर पायलला एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की अरमान मलिक ‘बिग बॉस ओटीटी 3’ तिसऱ्यांदा लग्न(married) करुन बाहेर येणार का? त्यावर उत्तर देत पायल म्हणाली की “तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. पण असं नाही. एक क्लिप व्हायरल होतेय, ती मी देखील पाहिली. ज्यात अरमान हा वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षितकडे पाहतोय आणि तो तिला बहीण मानतो.
बिग बॉसमध्ये येण्याआधी देखील अरमान चंद्रिका आणि तिच्या नवऱ्याला भेटलाय. तर मला माहितीये चंद्रिका मला वहिनी बोलते आणि त्याला दादा बोलते. तर तिथे बोलण्यात आलं आहे की तो चंद्रिकाकडे घाणेरड्या नजरेनं पाहत आहे. त्याची नजर ही चांगली नाही. त्याशिवाय ते सना मकबूलल विषयी देखील बोलत आहेत. हे अरमाननं केलं तुम्हाला ते चुकीचं वाटतंय. दुसरीकडे विशाल अनेकदा बोलला वहिनी चांगली वाटते. वहिणी सुंदर दिसते. वहिणी विना मेकअप चांगली दिसते. ते तुम्हाला अगदी योग्य दिसतं. तो चांगल्या मनानं बोलतोय असं तुम्हाला वाटतं.
अरमाननं चंद्रिकाकडे पाहिलं तर ते चुकीचं. मला इतकंच सांगा की त्याची एकच चूक आहे का की त्यानं दोन लग्नं केली. त्या दोघींना तुम्ही बिग बॉस ओटीटीमध्ये पाहिलं. आम्हाला त्या आधी देखील लोक ओळखत होते पण बिग बॉसमध्ये आल्यानंतर लोकं आमचा द्वेष करत आहेत.”
पुढे पायल म्हणाली, “अरमान मलिक हा तिसरं किंवा चौथं लग्न करतोय असं काही नाही, नाही तो लग्न करणार. कारण त्याच्या आयुष्यात मी आणि क्रितीका आधीपासून आहोत आणि 4 मुलं देखील आहेत. त्यामुळे हा प्रश्न विचारणं चुकीचं असेल की अरमान मलिक तिसरं लग्न करून रिअॅलिटी शोमधून बाहेर येणार का? मी लोकांना विनंती करते की हे सगळं बोलणं आणि विचार करणं बंद करा.”
हेही वाचा :
कतरिना कैफ होणार आई?, सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
तुला शाळेतूनच काढतो, संचालकांच्या धमकीने विद्यार्थीची घरी जाऊन आत्महत्या
तीन मोठे आयपीओ सूचिबद्ध होणार, गुंतवणूकदारांवर पडणार पैशांचा पाऊस?