अमेरिकेतील मंदीचे सावट सध्या कमी झाले आहे. त्याचाच परिणाम शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारावर दिसून आला. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेची मध्यवर्ती फेडरल बँक व्याजदरात घट करण्याची शक्यता आहे, त्याचेही परिणाम भांडवली बजारावर पडत आहेत.
या अशा एकंदरीत जगातिक आणि राष्ट्रीय घडामोडींचा आधार घेत ब्रोकरेज हाउस एसबीआय सिक्योरिटीजने टाइम टेक्नोप्लास्ट या कंपनीचे शेअर अखरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीने गेल्या एका वर्षात साधारण 110 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
ब्रोकिंग फर्म SBI सिक्योरिटीजच्या म्हणण्यानुसार आगामी काळात टाईम टेक्नोप्लास्ट या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वित्त वर्ष 2024 साली या कंपनीचे व्हॉल्यूम ग्रोथ रेट 19 टक्के राहिला. जून 2024 पर्यंत या कंपनीला PE पाईप आणि कंपोझिट लिंडरच्या क्रमश: 200 कोटी आणि 175 कोटी रुपयांच्या ऑडर्स मिळाल्या होत्या.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये या कंपनीच्या CNG कम्पोझिट सिलिंडर्सच्या विक्रीत 100 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.एसबीआय सिक्योरिटीज या ब्रोकरेज संस्थेच्या मते सध्या या कंपनीचे अर्थकारण चांगल्या स्थितीत आहेत. या कंपनीने Time Technoplast या कंपनीच्या शेअर्सबाबत आगामी 12 महिन्यांचा विचार करून अंदाज बांधले आहेत.
आगामी 12 महिन्यांसाठी कंपनीने या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, असे एसबीआय सिक्योरिटीजने सुचवले आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 464 रुपये प्रतिशेअर ठेवण्याचे सूचवले आहे. 16 ऑगस्ट 2024 रोजी हा शेअर 0.65 टक्क्यांनी वाढून तो 385 रुपयांवर स्थिरावला. आगामी काळात या कंपनीच्या शेअरचे मूल्य 20 टक्क्यांनी वाढू शकते, असा एसबीआय सिक्योरिटीजचा दावा आहे.
टाईम टक्नोप्लास्ट ही कंपनी पॉलिमर आणि कम्पोझिट उत्पादनांच्या अग्रणी कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. या कंपनीकडून ड्रम, कंटेनर आणि ऑटो कम्पोनन्ट्स तसेच HDPE पाइप्सचाही समावेश आहे.
Time Technoplast या कंपनीच्या शेअरचे गेल्या 52 आठवड्यांतील सर्वाधिक मूल्य 394.40 रुपये आणि सर्वांत कमी मूल्य 130.20 रुपये आहे. या कंपनीचे भांडवली मूल्य 8,736.77 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरने एका आठवड्यात 17 टक्के, 3 महिन्यांत 34 टक्के आणि 6 महिन्यांत 79 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. चालू वर्षात हा शेअर 108 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर 190 टक्यांनी तर दोन वर्षांत 281 टक्क्यांनी वाढला आहे.
(टीप– शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात.तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी!
वाहन चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका, गाडीवरील नियंत्रण सुटलं अन्…
पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, मित्रानेच मित्राला संपवलं; गोणीत गुंडाळून झुडपात फेकलं