चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला आपला पुढील सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना असेल. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) दुखापतीमुळे संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे.

काही रिपोर्टनुसार, रोहित शर्मा(Rohit Sharma) पूर्णपणे तंदुरुस्त नाही. स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याला नीट हालचाल करणेही शक्य होत नसल्याचे समजते. इतकेच नव्हे, तर सराव सत्रादरम्यान त्याला नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना थ्रो डाऊन घेणे देखील शक्य झाले नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. मात्र, सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते. परंतु, २६ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या सराव सत्रात त्याला नेटमध्ये फलंदाजी करताना त्रास होत असल्याचे दिसून आले. रोहितने कोणत्याही शारीरिक हालचालींमध्ये भाग घेतला नाही आणि संपूर्ण सराव सत्रात त्याने थ्रो डाऊनचा सामना केला नाही. तो फक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर सपोर्ट स्टाफसोबत संघाशी संबंधित चर्चा करताना दिसला.
जर रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध झाला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीत केवळ संघाचा कर्णधारच नव्हे, तर सलामीची जोडीही बदलावी लागेल. नियमांनुसार, उपकर्णधार शुबमन गिल संघाचे नेतृत्व करू शकतो, तर रोहितच्या जागी केएल राहुलला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते.
अशा परिस्थितीत, मधल्या फळीत पाचव्या क्रमांकावर अतिरिक्त फलंदाजाला संधी मिळू शकते. जर असे झाले तर ही शक्यता आहे कि संघात मोठे बदल दिसतील आणि याचा परिणाम संघाच्या खेळावर होऊ शकतो.
हेही वाचा :
नाचणी ओट्सचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कॅल्शियमयुक्त ढोकळा, वजन राहील नियंत्रणात
बायकोनं भाजी केली नाही, नवऱ्याच डोकं सटकलं, कुऱ्हाडीने तुकडे केले अन् पोलिसांत गेला
ह्या साठी सुद्धा थोडी शिल्लक ठेवा ऊर्जा!