एका दिवसात 5 कप चहा पिण्याने काय होते?

चहा(tea)हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. चहा पिण्याने फ्रेश वाटते आणि रात्रंदिवस येणारा थकवा दूर होतो. बरेच लोक त्यांच्या सकाळची सुरुवात एका फ्रेश कप चहाने करतात, ज्याला ‘बेड टी’ म्हणतात. यानंतर ऑफिसमध्ये काम करताना अनेक कप चहा प्यायले जातात. मग संध्याकाळी फावल्या वेळात चहाचा आस्वाद घेतला जातो.

मात्र, जास्त चहा(tea) आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही. पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांच्याकडून जाणून घेऊया, तुम्ही दिवसातून 5 कप किंवा त्याहून अधिक चहा प्यायल्यास काय नुकसान होऊ शकते.

चहामध्ये कॅफिन असते, ज्याचे जास्त सेवन केल्याने झोप न लागणे, तणाव आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. दिवसातून 5 कप चहा प्यायल्याने कॅफीनचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जास्त चहा पिणे टाळावे असं सांगण्यात येते. तुम्हाला जर जास्त चहा पिण्याची सवय असेल तर ती वेळीच कमी करा

पचनाची समस्या
जास्त चहा प्यायल्यानेही पचनाच्या समस्या निर्माण होतात. जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी सकाळीच उठून चहा पिता अथवा मधल्या वेळातही काही न खाता चहा पित असाल तर चहामध्ये असलेले घटक अपचन आणि गॅस्ट्रिक अस्वस्थता वाढवू शकतात. सकाळचा चहा सर्वाधिक हानी पोहोचवू शकतो हे लक्षात घ्या.

दातांना होणारे नुकसान
चहामध्ये असलेल्या घटकांमुळे आणि त्याच्या उष्णतेमुळे दात कमकुवत होतात आणि इनॅमलदेखील खराब होतात. यामुळे श्वासाची दुर्गंधी देखील येऊ शकते. चहा पिताना, त्याचा दातांशी संपर्क कमी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सतत चहा पित असाल तर त्याचा दातावरही वाईट परिणाम होतो आणि दात पिवळेदेखील होतात

लठ्ठपणा
जे लोक जास्त चहा पितात त्यांच्या शरीरात अतिरिक्त साखर आणि कॅलरीज मिक्स होतात. ज्यामुळे लठ्ठपणा वेगाने वाढू लागतो. वजन कमी करायचे असेल तर चहा पिणे बंद करा किंवा चहा प्यायचा असल्यास तो अगदी नियंत्रणात प्या अथवा साखरेशिवाय पिण्याचा प्रयत्न करता, जेणेकरून तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होण्याची शक्यता कमी होईल

हृदयाचे आजार
अनेक आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जास्त चहा पिण्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, म्हणूनच भारतात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या खूप जास्त आहे असंही सांगितलं जातं अर्थात यावर अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र तरीही हृदयाचा त्रास होण्यामागे अति चहा पिणे हेदेखील कारण ठरु शकते.

हेही वाचा:

देशातील सर्वात मोठ्या संस्थेत नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?

शिंदे सेनेचा विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर, ‘या’ आमदाराला दिली संधी

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान