काय ती लोकसभा.. काय ती विधानसभा.. कोल्हापुरात शहाजी बापूंचा डायलॉग फिरवला

कोल्हापूर(Kolhapur) लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि इर्षा शिगेला पोचली आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शहाजी बापूंचा डायलॉग आता कोल्हापुरात चांगलाच फिरवला आहे.

‘काय ती लोकसभा.. काय ती विधानसभा.. काय ती विधान परिषद..’ अशा आशयाचा बॅनर लावत काँग्रेसच्या सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच बॅनर झळकवाला आहे. कोल्हापूरच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल शाहू महाराज छत्रपती यांच्या अभिनंदनाच्या आशयाचे बॅनर झळकवले आहेत.

मतमोजणीला काही तासांचा अवघी असताना कोल्हापुरात(Kolhapur) महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. महाविकास आणि महायुतीच्या दोन्ही कार्यकर्त्यांकडून आपापल्या उमेदवाराचा विजयाचा दावा केला जात आहे.

अशातच आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट बॅनर लावत आपला उत्साह दाखवून दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयाचे बॅनर कोल्हापुरातील वारे वसाहत येथील सनगर गल्ली फुटबॉल क्लब या ठिकाणी लावला आहे.

निकालाच्या पार्श्वभूमीवर काल दिवसभरात एक्झिट पोल सादर झाले आहेत. एक्झिट पोलनुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती आघाडीवर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे पिछाडीवर असल्याचे दिसतात.

जवळपास सर्वच संस्थानी एक्झिट पोलमध्ये कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराज छत्रपती खासदार होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. याच अंदाजाचा आधार घेत कार्यकर्त्यांनी आतापासूनच जल्लोष करायला सुरुवात केली आहे. दरम्यान या ठिकाणी लावलेल्या बॅनरची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठीचा निकाल स्पष्ट होणार आहे. विशेषत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे दोन विद्यमान खासदार मतदार संघात आपले नशीब आजमावत आहेत.

अशातच प्रशासनाकडून आणि जिल्हा पोलिस प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.कोल्हापूर लोकसभासाठी रमणमळा तर हातकणंगले लोकसभासाठी राजाराम तलाव येथे मतमोजणी होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत कोयता हल्लाप्रकरणी सहाजणांवर गुन्हा!

सांगली : माझ्या पायलटने दिशा ठरवल्यामुळे शक्य झाले’ विशाल पाटलांना विजयाचा विश्वास!

ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंवर कारवाई करा; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश