दिवाळी सणाच्या उत्साहात आज धनत्रयोदशी निमित्ताने देशभरात सोन्याच्या खरेदीचा उधाण पाहायला मिळत आहे. नागरिकांना असा विश्वास आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं (gold)खरेदी करून त्याचं पूजन केल्यास घरात लक्ष्मी नांदते. याच भावनेतून विविध शहरांतील सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
सोन्याचे वाढलेले दरही ग्राहकांना अडवू शकले नाहीत
यंदा सोन्याचे दर जवळपास 81 हजार 600 रुपये प्रति तोळा असे असून, गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 20 हजार रुपयांची दरवाढ नोंदवली गेली आहे. तरीही धनत्रयोदशीच्या विशेष मुहूर्तावर ग्राहकांची सोन्याच्या(gold)खरेदीसाठी आकर्षण कमी झालेलं दिसत नाही. मुंबईच्या प्रसिद्ध झवेरी बाजारापासून जळगावच्या सुवर्णनगरीपर्यंत, सर्वत्र सुवर्ण विक्रेत्यांच्या दुकांनांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी लोट दिला आहे.
लक्ष्मीपूजनासाठी चांदीची लक्ष्मी आणि आकर्षक दागिने
दिवाळीच्या काळात सराफ व्यवसायिकांनी ग्राहकांसाठी विविध आकर्षक डिझाईनमध्ये सोन्याचे दागिने उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, लक्ष्मीपूजनासाठी चांदीच्या लक्ष्मी मूर्ती आणि शिक्क्यांना विशेष मागणी आहे. सोन्याच्या खरेदीसाठी महिलांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही, विशेषतः दिवाळीनंतर येणाऱ्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर यंदा सराफ बाजारात खरेदीचा कल अधिक राहणार आहे.
ग्राहकांचा भावनिक जोड कायम
सोन्याच्या दरात झालेली वाढ आणि गृहिणींच्या बजेटवर याचा परिणाम झालेला असला तरी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या खरेदीची परंपरा कायम आहे.
हेही वाचा :
आज नरक चतुर्दशीला लक्ष्मी योग! जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
आज नरक चतुर्दशी, कुणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार?
Singham Again नंतर दीपिका पदुकोण करणार महेश बाबूचा 1000 कोटींचा सिनेमा?