पांड्यासाठी रोहित शर्माला जे जमलं नाही ते विराट कोहलीने केलं… उचललं हे मोठं पाऊल

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा(mumbai indians com) कर्णधार झाल्यापासून त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच, वानखेडे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांनी रोहित…रोहितच्या नारे लावून त्याला डिवचलं होते.

असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले, जेव्हा हार्दिक पांड्या गुरुवारी आरसीबीविरुद्ध फलंदाजीसाठी(mumbai indians com) उतरला. इकडे चाहत्यांनी त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. पण विराट कोहलीकडून मैदानावर जे दिसले ते आतापर्यंत रोहित शर्माकडून दिसले नाही. विराट चाहत्यांसमोर हार्दिकच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांना असे न करण्याची विनंती करताना दिसत आहे. कोहलीने त्याला हार्दिक पांड्याला चिडवू नका अशी विनंती केली. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर पांड्या बॅटिंगला आला तेव्हा हा प्रकार घडला. किंग कोहलीच्या या विनंतीचा परिणाम असा झाला की चाहत्यांनी लगेचच पाठ फिरवली आणि स्टेडियममध्ये हार्दिक…हार्दिक…चा आवाज ऐकू येऊ लागला.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजीत चमकदार होता, त्याने 4 षटकात केवळ 21 धावा देत 5 बळी घेतले. 197 धावांचे लक्ष्यही त्यांनी अवघ्या 15.3 षटकात पूर्ण केले, त्यात इशान किशनने 34 चेंडूत 69 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने अवघ्या 19 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. हार्दिक पांड्यानेही 6 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजयाकडे नेले. या आयपीएल मोसमातील 5 सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचा हा दुसरा विजय आहे.

हेही वाचा :

ब्रेकअप करण्यापूर्वी या ५ गोष्टी लक्षात ठेवा, नात्यातील दूरावा होईल कमी

भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत ‘या’ नेत्याची थोरल्या पवारांना साथ

कोल्हापुरात ‘राजकीय’ शर्यत! संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज