धोनीने प्रथमच फलंदाजीला येत जिंकला ‘हा’ खास पुरस्कार

विशाखापट्टणम : महेंद्रसिंग धोनी रविवारी या आयपीएलमध्ये(award) प्रथमच फलंदाजीला आला होता. या पहिल्याच सामन्यात धोनीने तुफानी फटकेबाजी केली आणि सर्वांची मनं जिंकली. पण प्रथमच फलंदाजीला आल्यावर धोनीने एक खास पुरस्कारही जिंकला. त्यामुळे सामना संपल्यावरही मैदानात धोनीच्या नावाचा जयघोष सुरुच होता.

चेन्नई सुपर किंग्सचा हा तिसरा सामना होता, पण धोनी मात्र प्रथमच यावेळी बॅटींगला(award) आल्याचे पाहायला मिळाले. धोनीचे यावेळी जोरदार स्वागत चाहत्यांनी केले. धोनी फलंदाजीला आला तेव्हा चेन्नईच्या संघाची अवस्था फारशी चांगली नव्हती. पण तरीही धोनी मैदानात आल्यावर त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या आशा होत्या. धोनी मैदानात आला तेव्हा त्याच्या नावाचे जोरदार नारे लावले जात होते. धोनीनेही यावेळी चाहत्यांना भरभरून आनंद दिल्याचे पाहायला मिळाले.

धोनी यावेळी जो पहिला चेंडू खेळला, त्यावर त्याने चौकार वसूल केला. त्यावेळी धोनी आता काही तरी खास करणार, याची कुणकुण लागली होती. धोनीने १७ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरही चौकार वसूल केला आणि चाहत्यांची आशा वाढवली. धोनीने त्यानंतरच्या षटकात धमाकेदार षटकार ठोकला चाहत्यांची मनं जिंकली. अखेरच्या षटकात तर धोनीने चाहत्यांना खूष करून टाकले. धोनीने अखेरच्या षटकात दोन षटकार आणि दोन चौकार लगावत २० धावांची वसूली केली. धोनीच्या या फटकेबाजीनंतरही चेन्नईला सामना जिंकता आला नाही.

दिल्लीने चेन्नईला २० धावांनी पराभूत केले, पण तरीही धोनीच्या नावाचीच जोरदार चर्चा सुरु होती. सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा सुरु झाला. त्यावेळी धोनीला एक खास पुरस्कार देण्यात आला. धोनीला देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे नाव होते ELECTRIC STRIKER AWARD. धोनी यावेळी सामना संपल्यावर हा खास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सामन्यात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. धोनीने यावेळी १६ चेंडूंत नाबाद ३७ धावांची खेळी साकारली. धोनीचा स्ट्राइक रेट यावेळी २२५.३१ एवढा होता, जो चेन्नईच्या डावात सर्वाधिक होता. धोनीने चेन्नईकडून या सामन्यात सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा केल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा :

गौतमी पाटीलच्या नवीन VIDEO तील अदांनी चाहत्यांना लावलं वेड

लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची अपघाती मृत्यू

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना ‘या’ नावानं मारतात हाक