आजकाल आपल्या करियरला (career) घेऊन अनेक विद्यार्थी चिंतेत असतात. १०वी आणि १२वी नंतर नेमकं काय करियर निवडायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. आजकालच्या स्पर्धेच्या जगामध्ये सर्व पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी सेटल व्हावं आणि चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करावं असं वटतं. मात्र चुकीचं करियर निवडल्यास तुमचं कामामध्ये मन लागत नाही आणि प्रगती देखील होत नाही. त्यामुळे करियर मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. तुम्ही पण नेमकं काय करियर निवडायचा असा प्रश्न पडला असेल तर मग आता चिंता नको कारण तिकिट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट तरफे मोफत करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
करियर (career) मार्गदर्शन शिबिरामध्ये १०वी, १२वी आणि पदवी नंतर तुमची आवड आणि स्किल्सनुसार नेमकं काय करियर योग्य आहे याचे मार्गदर्शन दिले जाते. अनेक विद्यार्थी MPSC, UPSC या स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करत असतात. स्पर्धा परिक्षेसाठी कशी तयारी करावी, परिक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो या बद्दल शिबीरामध्ये माहिती दिली जाते. २२ जून २०२४ ला सकाळी १०:३० वाजता SSC, MPSC, UPSC यासारख्या स्पर्धा परिक्षा देण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे .
सेंट्रल रेल्वे आयोजीत शिबीरामध्ये मध्य रेल्वेच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक माननीय श्री प्रविन्द्र वंजारी आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक, श्री बी.अरुण कुमार या माननीय वक्त्यांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडेल. या शिबीरामध्ये श्री संकेत सुरेश शिंदे (सेक्शन अधिकारी, क्लास I,मंत्रालय), रिलायबल अकॅडमी ठाणे याचे फाऊंडर श्री मनोहर पाटील आणि रिलायबल अकॅडमीचे डायरेक्टर श्री संदिप पाटिल यांची देखील उपस्थिती पहायला मिळेल. सर्व वक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन मिळेल.
सेंट्रल रेल्वे आयोजीत शिबिर मध्य रेल्वे सभागृह, पार्सल बिल्डिंग, चौथा मजला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या सभागृहामध्ये पार पडेल. तुम्ही देखील या मार्गदर्शन शिबिरात जाण्यासाठी इच्छुक असाल तर हरिश मोंडकर : ९१६७०८९०३६, व्ही डि पाटील : ९८६९३६८५६२ , बाला पिल्लाई: ९९६७१६२४०८ यांच्याशी संपर्क साधू शकता. करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यासाठी अध्यक्ष श्री सुहास जोशी, सचिव श्री डि.व्ही चिंदरकर, आणि खजिनदार श्री जी.बी कदम यांनी खुप मेहनत घेतली आहे. त्याचे ध्येय एकच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आणि करियर निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.
हेही वाचा :
बटाटा, कांदा, टोमॅटोनंतर आता डाळींच्या दरातही वाढ…
प्रेग्नंट दीपिकाला मदत करण्यासाठी अमिताभ बच्चन पुढे आले तेवढ्यात प्रभासनं…
इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना लागणार लॉटरी; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत