आजच्या महाराष्ट्राचे उद्याचे राजकीय चित्र काय असेल?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात(political)उलथा पालथ झाली. त्यानंतर सत्ता संघर्ष केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दालनात, सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर गेला. तिथे काही महत्त्वाचे मुद्दे अद्यापही प्रलंबित असताना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या. त्यासाठीचे मतदान सुद्धा झाले. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच प्रामुख्याने लढत झाली आहे.

वंचित आघाडी, परिवर्तन महाशक्ती आघाडी या सुद्धा रिंगणात होत्या. सर्वच प्रमुख राजकीय(political) पक्षांना या निवडणुकीत बंडखोरीला सामोरे जावे लागले. आता या एकूण पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा राजकीय चेहरा काय असेल? महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर पुन्हा एकदा उलथापालथ होईल काय? फोटो पडलेल्या राजकीय पक्षांचे पुन्हा मूळ पक्षाकडे जाणे होईल काय? राज्यपालांकडून सरकार बनवण्यासाठी कोणाला प्राचार्य केले जाईल यावर वरील प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत किंवा अवलंबून असणार आहेत.

महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे आणि मोठे राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई ही या राज्याची राजधानी आहे. आणि म्हणूनच या राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा आघाडीला देशातील राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळते किंवा मिळणार. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण त्यानंतर काहीच महिन्यात काँग्रेसची सत्ता असलेले हरियाणा राज्य हे भाजपने स्वतःकडे घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत या पक्षाला पुन्हा एकदा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार स्थिर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सत्ता हवी आहे. तशी सुद्धा मिळाली तरच एनडीए मधील काही घटक पक्षांना योग्य तो संदेश मिळणार आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला यावेळी अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

महायुती सरकारला पुन्हा संधी मिळणार नाही आणि म्हणूनच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या शेवटचा प्रारंभ महाराष्ट्रातून झालेला असेल. मोदी युगाचा अस्त होईल असे भाकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. महाराष्ट्रात भाजप हरल्यानंतर नितेश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एनडीए मधून बाहेर पडतील या गृहीतकावर आधारित शरद पवारांचे हे भाकित आहे. त्यांचे देशातील बऱ्याच राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याने त्यांचे हे भाकीत बेदखल करावे असे नाही. पण याच शरद पवारांचं”नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार नाहीत”हे भाकीत सत्यात उतरलेले नाही हे सुद्धा हे सुद्धा इथे लक्षात घेतले पाहिजे.

विधानसभा(political) निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला सत्ता हस्तगत करता येणार नाही आणि म्हणूनच सत्तेच्या जवळपास जाण्यासाठी प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी निवडणूकपूर्व आघाडी केली आहे. आघाड्यांचा हा सेफ गेम म्हणावा लागेल. पण लोकशाहीच्या आणि संविधानाच्या संकेतानुसार सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला सरकार बनवण्यासाठी राज्यपाल हे आमंत्रित करत असतात. आणि सध्याचा विचार करता भाजपने सर्वाधिक म्हणजे 150 पेक्षा अधिक जागा महायुती अंतर्गत लढवल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपला मिळतील म्हणजे त्यांनी 100 च्या आसपास जागा जिंकल्या तर राज्यपालांच्याकडून भाजपलाच आमंत्रण दिले जाईल. तुमचे हेल्पलाइन होऊ शकत इसवी सन 2014 मध्ये तसेच घडले होते. बहुमत होईल इतका संख्याबळ भाजपकडून नव्हतं पण तरीही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तेव्हा शपथ घेतली होती.

महाराष्ट्रात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या पेक्षा जास्त आहे. आणि या महिला मतदारांना “लाडकी बहीण” योजनेच्या माध्यमातून खुश केलेले आहे. ही योजना गेम चेंजर ठरू शकते. म्हणूनच महाविकास आघाडीने सुद्धा महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे पण मराठीत एक म्हण आहे “जेव्हाचे गहू तेव्हाच्या पोळ्या”असा विचार महिला मतदार करतील त्यामुळे सध्या तरी महिलांचा कल महायुतीकडे दिसतो आहे.

महाविकास आघाडी मधील काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट या तिघांनी प्रत्येकी 90 जागा लढवल्या आहेत. या आघाडीने 140 च्या आसपास जागा जिंकल्या तर पुन्हा सत्ता संघर्ष निर्माण होऊ शकतो. तेव्हा वंचित आघाडी, तिसरी आघाडी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना अतिशय महत्त्व येईल. हे छोटे पक्ष किंग मेकर च्या भूमिकेत येऊ शकतात. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये सध्या मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघणारे एकापेक्षा अधिक आहेत. किमान अर्धा डझन या पदासाठी इच्छुक आहेत त्यातून सत्तेचं गणित बिघडू शकत.

निवडणुकीचा(political) निकाल दिनांक 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. त्यानंतर 288 सदस्यांना शपथ दिली जाईल. हा शपथविधी दिनांक 26 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण झाला पाहिजे. कारण 26 नोव्हेंबर रोजी नवीन सभागृह कायदेशीररित्या अस्तित्वात येणार आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती यांना त्यापूर्वीच सत्तेच्या स्टेशन पर्यंत जाण्यासाठी 149 हा मॅजिक आकडा गाठावा लागणार आहे. तथापी राज्यपालांनी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले तर, त्या पक्षाला मॅजिक फिगर लेखी स्वरूपात राज्यपालांना सादर करावी लागेल.

हेही वाचा :

आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडी

शुक्र-शनीची होणार युतीया’ 4 राशींचं उजळणार भाग्य,

“निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला झटका”