व्हॉट्सअ‍ॅपने दिलं नवीन सरप्राईझ! व्हिडीओ कॉलसाठी आणलं धमाकेदार फिचर

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी नेहमीच काहीतरी अनोखे फीचर्स घेऊन येत(video call api) असते.आता तुमच्या कॉलिंग अनुभवात वाढीव वास्तववादीपणा तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी मजेदार फिचर लाँच करत आहे. म्हणजेच, लवकरच तुमच्या व्हिडिओ कॉलमध्ये तुम्ही स्पेशल इफेक्ट्स आणि फिल्टर्स वापरू शकणार आहात.

Snapchat आणि Apple नंतर आता व्हॉट्सअ‍ॅप (video call api)ही सुविधा घेऊन येत आहे. याआधी स्नॅपचॅटने ‘लेन्स’ आणि Apple ने ‘फेसटाइम’ मध्ये AR इफेक्ट्स आणले होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या Android 2.24.13 च्या बीटा आवृत्तीत या नवीन फीचरवर काम सुरू असल्याची माहिती WABetaInfo ने दिली आहे.

या AR इफेक्ट्समुळे कॉल अधिक आकर्षक आणि मनोरंजक बनतील. तुमच्या चेहऱ्यावर मजेदार फिल्टर्स वापरता येतील, जसे की त्वचा अधिक स्वच्छ दिसण्यासाठी ब्यूटीफाय फिल्टर किंवा कमी प्रकाशात चांगले दिसण्यासाठी लो-लाइट मोड असेल. आता AR व्हिडिओ कॉलमुळे तुमच्या प्रियजनांशी अधिक अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधता येईल.

व्हॉट्सअ‍ॅप केवळ इथेच थांबणार नाही. भविष्यात येणाऱ्या अपडेटमध्ये कॉल दरम्यान बॅकग्राउंड बदलण्याची सुविधाही मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच, तुमच्या नेहमीच्या कंटाळवाण्या बॅकग्राउंड ऐवजी एखादा रंगीबेरंगी किंवा मजेदार बॅकग्राउंड वापरून कॉल अधिक आनंददायक बनवता येणार आहेत.

त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल अधिक मनोरंजक करण्यासाठी इतरही काही इफेक्ट्स आणण्याच्या विचारात आहे. WABetaInfo नुसार, लवकरच तुम्ही तुमच्या वास्तविक व्हिडिओ फीडऐवजी तुमचा अवतार वापरण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे तुम्ही तुमची ओळख आणि डीपी हाईड करू शकता किंवा तुमच्या आवडीचे अवतार वापरून कॉलमध्ये अधिक क्रिएटिव्ह दिसू शकता. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हा अवतार पर्याय तुमच्या प्रायव्हसीसाठीही उपयुक्त ठरू शकेल. या नव्या फीचर्समुळे व्हाट्सअप वापरण्याचा आपला अनुभव नक्कीच मजेदार बनणार आहे यात शंका नाही.

हेही वाचा :

लक्ष्मण हाकेंच्या सर्व मागण्या मान्य, उपोषण अखेर मागे

मोठी बातमी! छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी

काँग्रेसच्या मोर्चातून धैर्यशील मानेंचा ‘शक्तीपीठ’वरून शिंदे सरकारला घरचा आहेर!