सध्याच्या ऑनलाईन युगात व्हॉट्सॲपचे नाव अग्रस्थानी आहे. व्हॉट्सॲपवर(whatsapp web business) आतापर्यंत जगभरातील लाखो युजर्स जोडले गेले आहेत. आताच्या डिजिटल युगात सायबर धोक्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी एक नवीन फिचर घेऊन येत आहे. आपल्या युजर्सचा चॅटिंग एक्सपेरियन्स सुधारण्यासोबतच कंपनी आता त्यांच्या प्रायव्हसीची विशेष काळजी घेणार आहे.
आता याच पार्शवभूमीवर कंपनी आपल्या युजर्ससाठी एक नवीन फिचर लवकरच आणण्याच्या विचारात आहे. तुम्हीही व्हॉट्सॲप(whatsapp web business) वापरत असाल तर तुम्हाला या नवीन फिचरची माहिती नक्कीच माहिती असायला हवी.
आता व्हॉट्सॲपवर यूजर्सना जेव्हाही एका नवीन अज्ञात ग्रुपमध्ये जोडले जाईल तेव्हा त्यांना या ग्रुपशी संबंधित एक कॉन्टेक्स्ट कार्ड दाखवले जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की, युजरने आपला नंबर सेव्ह न केल्यास हे नवीन फिचर उपयोगी पडेल. एखाद्या अनोळखी युजरद्वारे जर तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये ॲड केले तर तुम्हाला या ग्रुपचा भाग व्हायचे आहे की नाही, हे ठरवण्याचा पर्याय आता तुम्हाला उपलब्ध होणार आहे.
वास्तविक, व्हॉट्सॲप युजर्सना कॉन्टेक्स्ट कार्डद्वारे कोणत्याही अज्ञात ग्रुपची सर्व प्रकारची माहिती आधीच मिळेल. जसे की तुम्हाला ग्रुपमध्ये कोणी ॲड केले, ग्रुप कोणी बनवला आणि ग्रुप कधी बनवला. अनोळखी गृपबद्दलची माहिती आधीच माहिती पडल्यामुळे तुम्ही या ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकता. कंपनीचे म्हणणे आहे की, व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचरमध्ये युजर्सना पूर्वीप्रमाणेच एक्सपेरियन्स अनुभवायला मिळेल.
कंपनीने व्हॉट्सॲप ग्रुपशी संबंधित हे फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. येत्या आठवड्यात हे नवीन फीचर सर्व व्हॉट्सॲप युजर्सना सादर केले जाईल. म्हणजेच व्हॉट्सॲप वापरत असलेल्या प्रत्येक युजरला या नवीन फिचरचा लाभ घेता येणार आहे.
हेही वाचा :
नवीन पर्यटन धोरणास मान्यता मिळणार, 1 लाख रोजगार निर्माण होणार
तुमचा जोडीदार रिलेशनशिपमध्ये तुमचा वापर तर करत नाही ना? कसं ओळखाल?