राज्यात निवडणुका (election)जसजशा जवळ येत आहेत तसतशा ‘लाडक्या’ योजनांचा पाऊस पडू लागला आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी आजी, लाडके आजोबा अशा विविध योजनांच्या घोषणांनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. या योजनांचा खरा उद्देश जनतेच्या कल्याणाचा आहे की केवळ मतदारांना आकर्षित करण्याचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

योजनांच्या घोषणा, पण अंमलबजावणीची चिंता नाही?
या योजनांच्या घोषणा मोठ्या प्रमाणात होत आहेत, मात्र त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित होत आहेत. निवडणुकांनंतर या योजनांचे काय होईल, याबाबत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे.
विरोधकांचा आरोप – ‘ही योजना केवळ मतांची खेळी’
विरोधकांनी या योजनांवर टीका करताना त्यांना ‘मतांची खेळी’ म्हटले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी जनतेच्या पैशातून अशा योजनांची घोषणा करणे चुकीचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मतदारांची मागणी – ‘योजनांची अंमलबजावणी करा, आश्वासने देऊ नका’
या योजनांच्या घोषणांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्यांनी सरकारला प्रत्यक्ष कृतीची मागणी केली आहे. आश्वासने देण्यापेक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मतदारांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा :
१० मिनिटांत बनवा चटपटीत, कुरकुरीत पनीर कोळीवाडा, चवीला जबरदस्त!
सांगली: मनपाच्या निदान केंद्रातील अहवाल आता तुमच्या मोबाईलवर मिळवा!
विशाळगड वाद पार्श्वभूमीवर पोलिसांची जिल्ह्यात सतर्कता, सुरक्षा व्यवस्था कडक