अभिनेता अजय देवगणचा ‘रेड’ हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर(new movie) हा चित्रपट खूप हिट ठरला होता. राज कुमार गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. ‘रेड’ या चित्रपटात अजय देवगणने इन्कम टॅक्स ऑफिसरची भूमिका साकारली होती.
आता ‘Raid 2’या चित्रपटात देखील अजय देवगण(new movie) इन्कम टॅक्स ऑफिसरची भूमिका करून बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून देणार आहे. अजय देवगणला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आता आणखी उत्सुक झाले आहेत. मात्र, आता या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
राजकुमार गुप्ता यांनी एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. दरम्यान, ‘Raid 2’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही चाहत्यांना आशा होती की ‘Raid 2’ या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होईल. अजय देवगणला एका हिट चित्रपटातून पडद्यावर पाहायचे होते, पण आता चाहत्यांना त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
‘सिंघम अगेन’मुळे निर्मात्यांनी हा चित्रपट थांबवल्याचा दावा केला जात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना अजय देवगणच्या दोन चित्रपटांमध्ये संघर्ष नको आहे.
अजय देवगणचा ‘औरों में कहाँ दम था’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारच फ्लॉप झाला. या चित्रपटाने 6 दिवसात जवळपास 9 कोटींची कमाई केली. अजय देवगणसोबत तब्बूही या चित्रपटात आहे. त्याचबरोबर आता चाहते अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, करीना कपूर, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा :
टीम इंडियाचा स्टार शर्माने उरकला साखरपुडा! होणारी बायको आहे तरी कोण?
ख्यातनाम शिल्पकार कै. सदाशिव साठे यांनी साकारलेल्या शिल्पाकृतींचे मुंबईत शिल्प प्रदर्शन
इचलकरंजी यंत्रमागधारक संघटनेचे विज सवलतीसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन