राज्यातील विधानसभा निवडणुका(elections) पार पडल्यानंतर मुंबईकरांना मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. कारण आता मुंबई महापालिका निवडणुका कधी पार पडणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. मात्र आता पुढील तीन महिने मुंबई महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नाही.
यासंदर्भात राज्य निवडणूक(elections) आयोगाच्या कार्यालयातून माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुका घेण्यासाठी तीन महिन्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे तुर्तास राज्यातील कोणत्याही महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता नसल्याचं राज्य निवडणूक आयोगान म्हंटल आहे.
तसेच या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुका स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे असं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलं होतं.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर विजय वडेट्टीवारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वबळावर असेल तर आम्ही देखील वेगळं लढणार असं महत्वपूर्ण विधान केलं आहे. त्यामुळे आता पुढच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की एकत्र याचा निर्णय मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.
याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती सरकार म्हणून एकत्र लढू असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तसेच विधानसभा निवडणुकींनंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे येत्या एप्रिल महिन्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत.
हेही वाचा :
मनसे महायुतीत सामील होणार? ‘हा’ बडा नेता फडणवीसांच्या भेटीला
ऑलिम्पिक मेडलिस्ट पीव्ही सिंधू अडकणार लग्नबंधनात; इन्स्टावर एंग्जेमेंन्टचे फोटो
“लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार? जाणून घ्या सहाव्या हफ्त्याचे अपडेट्स”