कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे या देशाचे आदर्श आहेत. राजकारण्यांनी हे आदर्श त्यांच्या राजकारणाचा(political) भाग बनवता कामा नयेत. तथापि दुर्दैवाने राजकारण्यांना त्याचे भान नाही आणि तसे त्यांच्याकडे राजकीय “शहा”आपणही नाही. भारतीय संविधान या विषयावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल राज्यसभेत जे वक्तव्य केले आहे त्याचे समर्थन कोणीही करणार नाही.
आता याबद्दल देशात विशेषतः महाराष्ट्रात (political)निषेध मोर्चे काढले जात आहेत. या विषयावरून वातावरण तापण्यापूर्वीच अमित शहा वगैरेंनी सर्वसामान्य जनतेचे तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांचे समाधान होईल असा खुलासा करणे आवश्यक आहे.
भारतीय संविधान विषयावर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी “आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची विरोधकांची फॅशन बनली आहे. आंबेडकरांच्याऐवजी देवाचे नाव घेतले तर किमान त्यांना स्वर्गात जागा तरी मिळेल”. असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यातून अनेक अर्थ निघतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानही स्पष्ट होतो. शिवाय देव, ईश्वर, स्वर्ग हे सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून ध्वनीत होते.
आंबेडकरांचे नाव घेऊन तुम्हास स्वर्गप्राप्ती होणार नाही असाही त्यातून अर्थ काढता येतो. जे काही अर्थ निघतात ते सर्वच समर्थांनी या नाहीत आणि म्हणूनच त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरून काढले जाणारे मोर्चे हे स्वाभाविक प्रतिक्रियावादी आहेत असे म्हणता येईल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्ताधाऱ्यांच्याकडून अपमान केला जातो आहे. भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाहीत, त्यांचा तिरस्कार केला जातो, असा आरोप इंडिया तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी कडून केला जातो आहे. त्याच कारणावरून सध्या मोर्चे काढले जात आहेत निषेध आंदोलन केले जात आहे. पण त्यांच्या आंदोलनासही राजकारणाचा वास येतो आहे असे म्हटले तर वाघे ठरणार नाही.
अमित शहा यांचे वक्तव्य तुम्हास मान्य आहे काय असा प्रश्न एनडीए मधील नितेश कुमार तसेच चंद्रबाबू नायडू यांना विचारण्यामागे विरोधकांचा कोणता हेतू आहे? तो हेतूही तपासून पाहिला पाहिजे. अमित शहांच्या वक्तव्याचा एनडीए मधील घटक पक्षांनी विशेषतः नितेश कुमार आणि नायडू यांनी निषेध करून एनडीएतून बाहेर पडावे असेच त्यांच्या मनात आहे. जणू काही अमित शहांच्या वक्तव्याचे त्यांनी समर्थनच केले आहे असे त्यांना का वाटावे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हवामानाचा मुद्दा पुढे करून एनडीए मध्ये फूट पडावी हा हेतू मनात ठेवणे म्हणजे राजकारणच आहे.
राजकारणासाठी महामानवांचा वापर करणे याचेही समर्थन करता येणार नाही. अमित शहा यांनी माफी मागितली तरी त्यांची मानसिकता बदलणार आहे का हा प्रश्न उपस्थित करणे हा विरोधकांचा जो टप्पीपणा म्हणावा लागेल. माफी मागितली पाहिजे अशी मागणी करायची आणि माफी मागितली तर मानसिकतेचा मुद्दा पुढे करायचा हे योग्य नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वाधिक अपमान काँग्रेसने केला आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने कपटकारस्थान करून पराभूत केले आहे.
डॉक्टर बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांना राजीनामा देण्यापासून रोखण्याचा काँग्रेसने(political) कधीही प्रयत्न केला नाही. पंडित नेहरू यांना डॉक्टर बाबासाहेब नको होते आणि त्यांची विचारधारा त्यांना मान्य नव्हती असा युक्तीवाद भाजपच्या नेत्यांनी वारंवार केला आहे आणि आताही ते करत आहेत. आमच्यापेक्षा तुम्हीच जास्त अपमान करता असाही त्याचा अर्थ होतो म्हणजे अप्रत्यक्षपणे आम्ही अपमान करतो याची एक प्रकारे कबुली दिल्यासारखेच आहे.
काँग्रेसचे नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा सातत्याने अपमान होईल अशी विधाने वारंवार केली आहेत. या विषयावरून काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या(political) नेत्यांना, सावरकर यांच्या विषयी तुम्हाला इतके प्रेम असेल तर मग तुम्ही त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित का करत नाही असा उलटा सवाल महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्याकडून विचारला जातो. म्हणजे तुम्ही सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिला तर आम्ही सावरकरांच्या विषयी त्यांचा अपमान होईल असे बोलणार नाही आणि नाही दिलात तर सावरकर हा तुम्ही अस्मितेचा प्रश्न करू नका. असा काँग्रेसच्या युक्तीवादातून अर्थ निघतो.
एकूणच छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, आदि महामानव हे या देशाचे आणि या महाराष्ट्राचे आदर्श आहेत आणि म्हणूनच या आदर्शांना राजकारणासाठी वापरले जाऊ नये. तथापि दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांपासून, दोन अडीच वर्षांपासून हे आदर्श दुर्दैवाने राजकारणासाठी वापरले जाऊ लागले आहेत. या राजकारण्यांना राजकीय “शहा”णपण केव्हा येणार?
हेही वाचा :
राज्यमंत्रिपदाची ऑफर नाकारली, नाराज भुजबळ मुंबईत; कोणता निर्णय घेणार?
नवर्षापासून बस प्रवाशांच्या मोबाईलवर लोकेशन दिसणार
“25व्या वर्षी लग्न केले, पण…” तेजश्री प्रधानने लग्नावर व्यक्त केलं मत