भारतातील आरक्षण केव्हा संपणार?, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच मोठ विधान

काँग्रेस(congress) नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. राहुल गांधी विविध संस्था आणि विद्यापीठांना भेट देत आहेत. यावेळी त्यांनी भारत, इथली सामाजिक-राजकीय परिस्थिती यासह उद्योग धंद्यांवरही भाष्य केलं आहे.

राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमादरम्यान आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस(congress) पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार तेव्हाच करेल जेव्हा भारतात आरक्षणाच्या बाबतीत निष्पक्षता असेल आणि आता तशी परिस्थिती नाही. वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल यांनी हे विधान केल आहे.

हेही वाचा:

शुभवार्ता! महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त

धर्माचा व्यापक अर्थ सांगताना मोहन भागवत यांनी व्यक्त केले विचार

रश्मिका मंदानाचा अपघात, सोशल मीडियावर चाहत्यांना दिला प्रकृतीत सुधाराचा अपडेट