रोहित शर्माच्या घरी कधी हलणार दुसऱ्यांदा पाळणा? जुनियर हिटमॅनचे या महिन्यात होणार आगमन

भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)सध्या T२०फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता विश्रांती करत आहे. आता १६ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना होणार आहे. कालच न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

कॅप्टन रोहित शर्माची(Rohit Sharma)मॅनेजर त्याची पत्नी रितिका सजदेह आहे हे सर्वानाच माहिती आहे. रोहित शर्मा जेव्हाही कोणत्या सामन्यासाठी असो किंवा कोणत्याही शोमध्ये ती नेहमीच त्याच्या सोबत असते. आता रितिका आणि रोहित हे दोघे कुठेतरी जात असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यामुळे आता सोशल मीडियावर रितिका सजदेह हिच्या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचा एक इव्हेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता. यावेळी अनेक वृत्त आले होते की, रितिका ही पुन्हा प्रेग्नेंट आहे आणि लवकरच जुनियर हिटमॅन येणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

आता पुन्हा रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका या दोघांचा व्हिडीओ एक व्हायरल होत आहे. ज्या अकाउंटने या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्याने लिहिले आहे की, “काय वाटत तुम्हाला डिसेंबर की जानेवारीमध्ये येणार जुनियर हिटमॅन?” या व्हिडिओच्या खाली अनेक लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

रोहित शर्मा आणि रितिका यांची पहिली भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. रितिका स्पोर्ट्स मॅनेजर होती आणि त्यादरम्यान तिची हिटमॅनशी एका जाहिरात शूटमध्ये भेट झाली. रितिका ही युवराजची चुलत बहीण आहे असे युवराजने मुलाखतीमध्ये सांगितले होते आणि युवीने रोहितला रितिकापासून दूर राहण्याची सूचना देखील केली होती.

https://twitter.com/i/status/1845068358498038056

सहा वर्षे डेट केल्यानंतर रोहित शर्माने रितिकाला एका खास पद्धतीने प्रपोज केले होते. त्यानंतर रोहित शर्मा आणि रितिका यांचा विवाह १३ डिसेंबर २०१५ रोजी झाला. दोघांचे लग्न मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झाला होता. रोहित आणि रितिका यांना एक मुलगी आहे, तिचा जन्म २०१८ मध्ये झाला.

हेही वाचा:

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय!

महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई; ‘या’ आमदाराला केले निलंबित; कारण…

वाढलेल्या प्लॅनमुळे मोबाईलधारक त्रस्त; महिना 30 दिवसांचा मग 28 दिवसांचा रिचार्ज कसा?