इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न मार्गी कधी लागणार ..?

इचलकरंजीचा पाणी (water) प्रश्‍न सध्या अत्यंत संवेदनशील बनला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न राहिला. पाणी प्रश्‍नाबाबत सतत चर्चा होत राहिली. प्रत्येक उमेदवारांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न मीच सोडविणार असल्याचा दावा केला आहे. यासाठी फेटा न बांधण्यासह पुन्हा निवडणुकीला उभे न राहण्याची घोषणाही करण्यात आली. पाणी योजनेबाबत वेगवेगळे पर्याय असल्याचेही उमेदवारांनी सांगितले.

अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शहराला शासन स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचा शब्द इचलकरंजीकरांना दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी पाणी प्रश्‍नाला पुढील काळात गती निर्माण होण्याची आशा निर्माण झाली आहे. लोकसभेच्या दोन निवडणुका इचलकरंजी पाणी प्रश्‍नावरच गाजल्या.

पुढील लोकसभा निवडणुकीतील प्रचारात पाणी (water) प्रश्‍नाचा मुद्दा असणार नाही, कारण तोपर्यंत इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न मार्गी लागलेला असेल, अशी अपेक्षा इचलकरंजीकरांची आहे. प्रशासन आणि राजकर्ते यांनी समन्वयाने यामध्ये काम केल्यास पुढील काळात इचलकरंजीकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळणे शक्य होणार आहे.

हेही वाचा :

राज्यात चौथ्या टप्प्यात ५२.४९ टक्के मतदान..

आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावली, मतदारानेही थप्पड मारली Video

अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेच्या CSMT स्टेशनवरील वाहतूर विस्कळीत