इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून सर्वसामान्य लोकांच्या जीवावर(government) कारखानदारांसह सरकारलाही हादरे देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालेली जोरदार पीछेहाट ही शेतकरी आंदोलनाला धक्का देणारी ठरली आहे. पराभवानंतर शेट्टी यांनी शेतकऱ्यांना ‘माझं काय चुकलं ?’ असा सवाल करीत उद्वेग व्यक्त केला. मात्र, या पराभवाच्या निमित्ताने शेट्टी यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
दोन टर्म खासदारकीनंतर शेट्टी यांना गेल्या दोन निवडणुकांमध्ये(government) धैर्यशील माने यांनी पराभवाची धूळ चारली आहे. मात्र, इथे शेतकरी आंदोलनाचे भवितव्य काय, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. गत दहा वर्षांत शेट्टींचे अनेक साथीदार त्यांना सोडून गेले. शेट्टींनी त्याकडे दुर्लक्ष केले. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबरचे चळवळीचे बहुतेक कार्यकर्ते आता त्यांच्यासोबत नाहीत. गेल्या पाच वर्षांत ऊस आंदोलनाला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातून शेतकऱ्यांच्या पदरातही काही फारसे पडले नव्हते. त्यामुळे शेट्टींचा मुख्य मुद्दाच फिका पडला होता.
अशावेळी त्याची भरपाई करण्यासाठी त्यांनी निवडणूक तंत्रातील नवे मुद्दे शोधायला हवे होते. विशेषतः सांगली जिल्ह्यातील सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील यांच्यासारखे नेते त्यांना नव्याने जोडता आले नाहीत. या दोघांनी सुरुवातीच्या काळात शेट्टींना घराघरांत पोहोचवले. चळवळ वाढू लागली. गावोगाव लोकांचे पाठबळ मिळू लागले. बी. जी. पाटील, सयाजी मोरे, विकास देशमुख हे मराठा समाजातील सांगली जिल्ह्यातील गावखेड्यात काम करणारे चांगले सोबती शेट्टींना मिळाले. यांच्या जीवावर चळवळ यशोशिखरावर पोहोचली. याच काळात शेतकरी चळवळ मराठवाडा, विदर्भापर्यंत पोहोचली. तिकडे रविकांत तुपकर, देवेंद्र भुयार असे नेते पुढे आले.
देवेंद्रसारखा कार्यकर्ता आमदार झाला. सदाभाऊ खोत मंत्री झाले. मात्र शेट्टींना हाताळताना भाजपने दाखवलेली चतुराई शेट्टींनी ओळखली नाही. यावेळी त्यांना मराठा-जैन अशा जातीयवादाच्या चक्रात अडकवण्यात आले. मात्र, संयमी शेट्टींना हे प्रकरण योग्य पध्दतीने हाताळता आले नाही. पुढे खोत, भुयार भाजप-राष्ट्रवादीच्या वाटेवर गेले. सांगली जिल्ह्यातही बी. जी. पाटील, सयाजी मोरे, विकास देशमुख यांनीही स्वाभिमानीची साथ सोडली. या सर्वच कार्यकर्त्यांना हलक्यात घेणे शेट्टींना महागात पडले.
राष्ट्रवादीसोबतची(government) त्यांची हातमिळवणी सार्वत्रिक निवडणुकीपुरती नव्हती. त्यानंतरही विधान परिषदेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या प्रतिमेला धक्का देणारे होते. या काळात चळवळ थंडावत गेली. कारखानदारांसोबतचे अंतर न राहता त्यांचे अनेक कार्यकर्ते कारखानदारांच्या गाडीत दिसू लागले. त्यांचा हा कल त्यांचे सोवळे फेडणारे होते. या घडामोडीत जनमत दुरावल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.
असो..शेट्टी खरं तर चळवळीतील नेते असून, त्यांचे अस्तित्व सर्व शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे. शेट्टींना नाऊमेद व्हायची गरज नाही. दोन टर्म खासदारकी त्यांना इथल्या शेतकऱ्यांनीच दिलेली आहे. त्यांचा मुद्दा संपलेला नाही. फक्त तो मुद्दा नव्याने शेतकऱ्यांपर्यंत न्यायला हवा.
शेट्टी यांनी निवडणुकीत सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊ नये, असा मतप्रवाह जरुर होता. मात्र, काळानुरूप राज्याचे नॅरेटीव्ह बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. उध्दव ठाकरेंविषयी असलेली सहानभुती त्यांच्या लक्षात आली नाही. त्यांनी महाविकास आघाडीकडून लढावे ही अट बदललेल्या संदर्भात त्यांनी मनावर घेतली नाही. इथे त्यांची ताठर भूमिका त्यांना पराभवापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली. यावेळी सर्वच पक्ष बाजूला गेल्यानंतर त्यांना त्यांची पुरती दमछाक झाली. चळवळीच्या घटलेल्या जनाधाराची जाणीवही त्यांना झाली.
हेही वाचा :
निवडणुकीत असे कसे घडले? महायुतीचे नेते विचारात पडले
यंदा पण लसण खिसा कापणार; किंमत झाली दुप्पट
कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीने झालं स्वस्त