कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बदलापूर येथील “आदर्श” शिक्षण (education system)संस्थेच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला. राज्यात आणि देशात त्याचा निषेध झाला, आजही तो होतो आहे. बदलापूर ने तर आक्रोश केला. अशा अति संवेदनशील घटनेची दखल घेण्यास, फिर्याद दाखल करून घेण्यास, गुन्हा नोंद करण्यास पोलिसांनी तब्बल 11 तासांचा विलंब केला. त्याची नोंद किंवा दखल मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय गांभीर्याने घेतली असून पोलिसांना त्यांच्या “सद्ररक्षणाय, खलनिग्रहणाय” या ब्रीद वाक्याची आठवण करून दिली आहे आणि राज्य सरकारला सुद्धा खडसावले आहे. गुन्ह्यांची आकडेवारी वाढू नये म्हणून फिर्यादच दाखल करून घ्यायची नाही अशी एक वेगळीच भूमिका पोलिसांच्या कडून सध्या घेतली जाते आहे. आणि आता तर ती दृढ होऊ लागली आहे. कच्ची फिर्याद हा नवाच प्रकार काही पोलिसांनी शोधून काढला आहे.
पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी अंमलदार हा तांत्रिकदृष्ट्या प्रमुख असतो. स्टेशन डायरीचा चार्ज (education system) घेताना ठाणे अंमलदार हा”माझ्या पाळीत गंभीर गुन्हा दाखल करण्याची माझ्यावर वेळ येऊ नये”अशी प्रार्थना करतो. कारण गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया त्यालाच पूर्ण करावी लागते. आणि म्हणूनच की काय तक्रार आली तरी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. बलात्कार, लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार अशा प्रकारची तक्रार आली तर ती पटकन दाखल करून घेतली जात नाही.
बदलापूर पोलिसांकडून तेच घडले. रियाज दाखल करून घेण्यास पराकोटीचा विलंब केल्याचे समोर आल्यानंतर बदलापूर पेटले. मुंबई उच्च न्यायालयाकडून त्याची दखल घेतली गेल्यामुळे प्रकरण गंभीर वळणावर येऊन पोहोचले आहे असे म्हणावे लागेल. पोलिसांना त्यांच्या ब्रीदवाक्याची आठवण करून द्यावी लागते, पोलिसांना ब्रीद वाक्याशी प्रामाणिक रहा असे सांगण्याची वेळ येते तेव्हा ग्रास रूटवर पोलिसिंग कशा प्रकारचे चालू आहे हे लक्षात येऊ शकेल. पोलीस प्रशासनाच्या प्रमुखांनी त्याबद्दल आत्मचिंतन केले पाहिजे.
बदलापूरची आणखी एक उपकथा पुढे आली आहे. आणि ती सुद्धा संताप यावा अशी आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान शहर प्रमुख वामन म्हेत्रे यांच्याकडून हे अत्याचार प्रकरण मीडियाने तापवले आहे, मीडियाकडून पराचा कावळा केला गेला आहे असे वातावरण तयार करण्याचा क्षीण प्रयत्न केला आहे. एका पत्रकार तरुणीला तर रस्त्यावर अडवून “तुझ्यावर रेप झालाय काय?” असा विचित्र सवाल या म्हेत्रे यांनी केल्यानंतर त्या पत्रकार तरुणीने पोलीस ठाण्यात वामन म्हेत्रे यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. पण पोलिसांनी फिर्यादी घेण्यास थेट नकार दिला. आधी बदलापूरचं वातावरण शांत होऊ दे मग तुमच्या तक्रारीची दखल घेतो अशी भूमिका पोलिसांनी घेतली. फिर्याद घेण्यास विलंब झाल्यामुळे बदलापूर मध्ये काय घडले हे माहीत असूनही तिथल्याच पोलिसांनी, फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली आहे.
“काय ग, तुझ्यावर रेप झालाय काय”असं एखाद्या तरुणीला उद्देशून बोलणे हा एक प्रकारचा शाब्दिक बलात्कार आहे, तो विनयभंगाचा गुन्हा आहे, आणि तो माजी नगराध्यक्षपद भूषवलेल्या वामन म्हेत्रे यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने केला असल्यामुळे त्याचे गांभीर या आणखी वाढते. एखाद्या स्त्रीकडे बघण्याची मानसिकता त्यातून स्पष्ट होते.
कोलकाता येथील आर जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या(education system) रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या होण्याचा प्रकार काही दिवसापूर्वी घडल्यानंतर त्याबद्दल देशभर संताप व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रातील बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. आता आणखी काही अशीच प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत.
बदलापूर नंतर परभणी आणि आता कोल्हापुरात सुद्धा तसाच एक अमानुष्य प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका बालिकेचा मृतदेह ग्रामीण पोलिसांना आढळून आला. या बालिकेवर अत्याचार करून नंतर तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाली आहे. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंदे गावच्या रामजी नगर मध्ये हा प्रकार घडला आहे. याच गावात एका बालिकेवर अत्याचार करून तिचे हत्या करण्याचा प्रकार दहा वर्षांपूर्वी घडला होता.
बलात्कार, लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषण असे गुन्हे महाराष्ट्रात वाढू लागले आहेत. गेल्या काही महिन्यात पोक्सो कायद्याखाली महाराष्ट्रात 905 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याचा अर्थ लहान मुलींवर अत्याचार होण्याचे प्रकार वाढले आहेत. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे निश्चितच भूषणावह नाही. आम्ही सुरक्षित आहोत असे मुलींना,
महिलांना वाटले पाहिजे असे वातावरण तयार करण्याची जबाबदारी केवळ राज्य शासनाची नव्हे तर सर्वांचीच आहे.
हेही वाचा:
महिला सुरक्षा उपाययोजना: नवीन पुढाकार आणि राज्यव्यापी सुधारणा
बदलापूरात शाळेतील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातल्या लेकी बाळींसाठी उद्या महाराष्ट्र बंद
मनसेच्या बैठकीत गोंधळ; उमेदवारीच्या निर्णयावर हाणामारी, राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर वाद चिघळला