विश्वजित कदम वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल : संजय राऊत 

विश्वजित कदम हे वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल. त्यांना स्वत:ला सिद्ध(tiger) करायचं असेल तर चंद्रहार पाटलांना विजयी करा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. वसंतदादा पाटील हे वाघ होते, हे आम्ही पाहिले आहे. विश्वजित कदमांना स्वतःला वाघ समजत असतील तर त्यांनी सिद्ध करायला हवं. त्यांनी चंद्रहार पाटील यांना विजयी करावं 4 जूनला आम्ही त्यांचा सांगलीत येऊन सत्कार करू असे राऊत म्हणाले.

सांगलीतील जनता वाघासारखी(tiger) आहे. पण विश्वजित कदम हे वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल असे संजय राऊत म्हणाले. विश्वजित कदमांना स्वतःला वाघ समजत असतील तर सिद्ध करायला हवे असंही ते म्हणाले. कोल्हापूर, हातकणंगले, सांगली असा उद्धव ठाकरेंचा यशस्वी दौरा पार पडला आहे. चंद्रहार पाटील यांच्यासासाठी भव्य सभा पार पडली, ज्यात कॉंग्रेस नेते व्यासपीठावर होते. कालची सभा सकारात्मक झाल्याचे राऊत म्हणाले. ते सांगलीत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एक भाजपचा अधिकृत उमेदवार , एक अनधिकृत उमेदवार आहे असं म्हणत राऊतांनी विशाल पाटील यांना टोला लगावला.

महाराष्ट्रातले सध्याचे नेते सगळेच व्हिलन आहेत, तर त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत अशी टीका राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. पूर्वीच्या काळातले हिंदी सिनेमातील विलन पाहिले असतील. त्या सगळ्यांना एकत्र केलं तर, जो व्हिलन तयार होतो, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस असल्याचे राऊत म्हणाले. भाजपचे दोन उमेदवार असल्याने दुसऱ्या उमेदवारासाठी भाजपने काही प्रचारक नेमले असतील. विशाल पाटील यांच्या सभेसाठी येणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनाही त्यांनी टोला लगावला. सांगलीच्या जागेबाबतचे शरद पवार यांचे वक्तव्य नाराजीतून आहे असे मला वाटत नाही. कारण, आम्हाला देखील अनेक उमेदवारी या टीव्हीतूनच कळाल्याचे राऊत म्हणाले.

.

दरम्यान, जयंत पाटील यांची वाघाची डरकाळी आहे. हे वाघ जतन केले पाहीजेत असे राऊत म्हणाले. सांगलीतबाबत राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे. विशाल पाटील यांच्यावर कारवाईबाबत मी बोललो असल्याचे राऊत म्हणाले. जर ठकारेंबदल प्रेम असते तर मोदींनी शिवसेना बेईमान माणसाकडे दिली नसते असे राऊत म्हणाले. मोदींनी खिडकी काय दरवाजा उघडला तरी काही फरक पडणार नाही असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा :

काँग्रेसला अजून एक धक्का, माजी मुख्यमंत्री भाजपात जाणार? या नेत्याचा दावा

सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला

सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..