इंडियन प्रीमियर लीग(Rohit Sharma) ही जगातील सर्वात मोठी टी 20 लीग असून लवकरच आयपीएलच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. नोव्हेंबर महिन्यात मेगा ऑक्शनचं आयोजन केलं जाणार असून यापूर्वी प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नावं 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करावी लागणार आहेत.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/10/image-433.png)
यंदा रोहित शर्मा(Rohit Sharma) कोणत्या टीमकडून खेळणार याविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे. बंगळुरूमध्ये एका चाहत्याने रोहितला आयपीएलमध्ये कोणत्या टीमकडून खेळणार असा प्रश्न विचारला. यावर रोहितने दिलेलं उत्तर ऐकून सर्वच चकित झाले.
आयपीएल 2024 मध्ये रोहितला मुंबई इंडियन्सने कर्णधार पदावरून बाजूला करत हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवले होते. त्यामुळे रोहित नाराज झाल्याचं सांगितलं जात होतं. तसेच यामुळे मुंबई इंडियन्सने त्यांच्या फॅन्सची नाराजी ओढवून घेतली होती. आता मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या संघातील 6 खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने दिलेली आहे.
31 ऑक्टोबर पर्यंत सर्व संघांना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर करायची आहेत. मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. तर रोहित ऑक्शनमध्ये आला तर त्याला आपल्या संघात घेण्यासाठी बऱ्याच फ्रेंचायझी उत्सुक आहेत. अशातच चाहत्याने रोहितला प्रश्न विचारला ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चौथ्या दिवशी पाऊस पडल्याने बंगळुरूमध्ये सुरु असलेल्या भारता विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सामना काहीवेळ थांबला होता. तेव्हा रोहित शर्मा ग्राऊंडची पाहणी करून ड्रेसिंग रूममध्ये जात असताना त्याला एका चाहत्यानं विचारलं, ‘ रोहित आयपीएलमध्ये कोणती टीम?’. यावर रोहितने मस्करीत विचारलं, ‘किधर चाहिये बोल?’. यावर चाहता म्हणाला, ‘RCB मध्ये ये रोहित Love You’ हे ऐकून रोहित हसत ड्रेसिंग रूममध्ये गेला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
हेही वाचा:
एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला निवडणूक आयोगाचा झटका?
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा! शरद पवार यांचा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का
दिवाळीआधीच ‘या’ बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात