बस चालवता, चालवता ड्रायव्हर अचानक हार्ट अटॅकने

किरण असं बस ड्रायव्हरच( driver)नाव असून तो 40 वर्षांचा होता. तो बस घेऊन निलमनगरहून यशवंतपूर येथे चालला असताना अचानक त्याच्या छातीत दु:खू लागलं. त्याची शुद्ध हरपली.सध्या कार्डिअक अरेस्ट आणि हार्ट अटॅकच प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कार्डिअक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. सध्या हे जे प्रमाण वाढलय, त्याला आपली बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याच बोललं जातय. कार्डिअक अरेस्ट आणि हार्ट अटॅक कधी कुठे येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका बस ड्रायव्हरला स्टेअरिंगवर असताना अचानक ह्दयविकाराचा झटका आला. हा ड्रायव्हर बस चालवता, चालवता स्टेअरिंगवर कोसळला.

बंगळुरु महानगर परिवहन सेवेच्या बसमध्ये सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. किरण असं बस ड्रायव्हरच (driver)नाव असून तो 40 वर्षांचा होता. तो बस घेऊन निलमनगरहून यशवंतपूर येथे चालला असताना अचानक त्याच्या छातीत दु:खू लागलं. त्याची शुद्ध हरपली. तो स्टेअरिंगवरच कोसळला. सुदैवाने जवळच उभ्या असलेल्या कंडक्टरच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने लगेच स्टेअरिंगचा ताबा आपल्या हाती घेऊन बस थांबवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

किरणला लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर किरणला मृत घोषित केलं. BMTC च्या अधिकाऱ्यांनी कंडक्टरने जे प्रसंगावधान दाखवून निर्णय घेतला, त्याचं कौतुक केलं. BMTC च्या 7,635 कर्मचाऱ्यांपैकी 40 टक्क्यांपेक्षा जास्त 45-60 वयोगटातील आहेत.

किरण कुमारच अकाली निधन झालं, हे जाहीर करताना आम्हाला खूप दु:ख होतय. 6 नोव्हेंबरला अचानक आलेल्या ह्दयविकाराच्या झटक्याने किरण कुमारच वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं. बंगळुरु महानगर परिवहन सेवा किरण कुमारच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असं BMTC ने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. BMTC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किरण कुमारच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचं सांत्वन केलं.

हेही वाचा :

घटस्फोटाच्या अफवांमध्ये अभिषेक ऐश्वर्या नव्या सिनेमात येणार एकत्र?

लहान मुलांना वारंवार ताप का येतो?

हिवाळ्यात आजारी पडणार नाही, आजपासूनच सुरु करा ‘हे’ उपाय