मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आगमनाचे मोठे जल्लोषात स्वागत (welcome) करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवत आणि गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करत ठाकरेंची आतुरतेने वाट पाहिली. राज ठाकरे जेसीबीच्या गाड्यांवरून फुलांची उधळण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहून कारमधून उतरले नाहीत, परंतु उत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही.
विश्रामगृहावर प्रचंड गर्दी
शासकीय विश्रामगृहाच्या रस्त्यावर चार जेसीबी गाड्यांमधून कार्यकर्त्यांनी गुलाबाच्या फुलांची उधळण केली. रस्त्यावर ठाकरेंच्या स्वागताचे (welcome) फलक झळकवण्यात आले होते आणि प्रचंड गर्दी जमली होती.
राज ठाकरेंचा हिंगोलीत मुक्काम नाही
सोलापूर, लातूर, धाराशिवनंतर आज हिंगोलीत दाखल झालेल्या राज ठाकरेंचा परभणी येथे मुक्काम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर, सोलापुरात ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे मराठा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. धाराशिवमध्ये आंदोलकांनी हॉटेलमध्ये घुसून गोंधळ घातल्यानंतर हिंगोलीत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
मनोज जरांगेंची टीका
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सोलापूरमध्ये राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी सांगितले की, “राज्याला आरक्षणाची गरज नाही असे बोलणाऱ्यांचे दौऱ्यात नुसते बोर्डच दिसतात, माणसंच नव्हती. आपण संयमी आहोत, पण एकदा मागे लागलो की काय होते हे तुमच्या बार्शीच्या आमदाराला माहित आहे.”
हेही वाचा :
काँग्रेस सरकारने गीता-बबिता यांच्याशी केला भेदभाव : महावीर फोगाट
गुड न्यूज! गेल्या महिन्यात नोकऱ्यांच्या मागणीत १२ टक्के वाढ
Tata Curvv EV ने बाजारात घेतली कडक एन्ट्री, देणार 585Km रेंज