मुंबईत मुस्लिम मतदारांचा कल कोणाकडे? जाणून घ्या समीकरण

मुंबईतील मुस्लिम समाज पारंपरिकरित्या (Muslims)(९२ च्या दंगलीनंतर दोन निवडणुका वगळता) काँग्रेससोबतच राहिलेला दिसतोमुंबईत मुस्लिम मतदारांचा कल कोणाकडे? जाणून घ्या समीकरण

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन(Muslims) आघाडी आणि ‘एमआयएम’ युतीने राज्यात भाजप-विरोधी आघाडीच्या मतांमध्ये मोठी फूट पाडण्यात यश मिळवले होते. मात्र मुंबईतील सर्व मतदारसंघामध्ये या युतीचा फार प्रभाव दिसला नव्हता.

‘हो ,शिवसैनिकांनी बाबरी पाडली’ असं उद्धव ठाकरे ठणकावून सांगतात, तरीही त्यांच्या सभांना मुस्लिम समाजाची लक्षणीय उपस्थिती दिसते. काँग्रेससोबत असल्याचा हा परिणाम आहे की भाजपविरोधी प्रखर चेहरा म्हणून उद्धव ठाकरे पुढे येत असल्याने परिघावरचा मुस्लिम समाज भगवा झेंडा हातात घेतोय, याची चाचपणी आवश्यक ठरते.

मुंबई शहरातील मुंबई (दक्षिण), मुंबई (दक्षिण-मध्य), आणि मुंबई (उत्तर-मध्य) या तीन मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. तर मुंबई (वायव्य), मुंबई (ईशान्य) आणि मुंबई (उत्तर) या मतदारसंघातही मुस्लिमांची संख्या उल्लेखनीय आहे. आघाडीत या तीनपैकी मुंबई (उत्तर-मध्य) मतदारसंघ वगळता इतर दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे (ठाकरे गट) आहेत. २०१४ पासून भाजप-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेने हे दोन्ही मतदारसंघ सलग जिंकले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचा मोठा प्रभाव असला तरी आता शिवसेना-भाजप युती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेला त्यांची ‘हिंदू व्होट बॅंक’ कायम ठेवून आघाडीतील मित्रपक्षांची मते आपल्याकडे कशी वळतील हे पाहणे आवश्यक ठरेल.

ठाकरेंची शिवसेना ‘इंडिया’चा घटक पक्ष झाल्यामुळे याचा त्यांना लाभ होऊ शकतो. राजकीय विश्लेषक नचिकेत कुलकर्णी याबाबत म्हणाले, ‘१९९२ च्या दंगलींनंतर मुंबईतील मुस्लिम व्होट बॅंक काही काळासाठी समाजवादी पक्षाकडे सरकली होती. कालांतराने ती पुन्हा काँग्रेसकडे आलेली आहे. ‘इंडिया’ आघाडीत उद्धव ठाकरे आल्याने काँग्रेसच्या मतांचा फायदा शिवसेनेला नक्कीच होईल. भाजपला हरवण्याची क्षमता असणाऱ्यांच्या मागे मुस्लिम समाज उभा राहण्याची दाट शक्यता वाटते. यापूर्वी काय झाले त्यापेक्षाही मुस्लिम समाजाला त्यांच्या पुढच्या भविष्याची चिंता वाटते. परिघावरच्या समाजाला कायम भक्कम सामाजिक आधार लागतो, जो मुस्लिम समाजाला काँग्रेससोबत वाटतो. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेसोबतही वाटू शकते.’

हेही वाचा :

अजित पवारांच्या येण्याने शिंदे गटाला फटका; तीन ते चार जागांवर नुकसान

2 पाय-या चढल्यावरही लागते भयंकर धाप? होता घामाने ओलेचिंब?

भाजपच्या इच्छुक उमेदवाराने दिली ठाकरे गटाच्या नवरात्रोत्सवाला भेट; राजकीय चर्चांना उधाण