कोण आहे पंजाबची कतरिना? अभिनेत्रीच्या BTS व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल आहे. शहनाज गिलने(actress) करिअरची सुरुवात पंजाबी गाण्यांमधून केली, ज्यात ‘शिव दी किताब’ आणि ‘वखरा स्वॅग’ सारखी गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

2019 मध्ये तीने ‘बिग बॉस 13’ या रिअ‍ॅलिटी शोमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर तिने पंजाबी चित्रपटांमध्ये यशस्वी पदार्पण केले आणि बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला. शहनाजने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि सध्या तिच्या ‘सजना वे सजना’ या गाण्यामुळे ती प्रचंड चर्चेत आहे.

‘इक कुडी’ हा शहनाजसाठी(actress) खूप खास प्रोजेक्ट आहे, कारण अभिनेत्री या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून पदार्पण करत आहे. एवढेच नाही तर ती चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेतही दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमरजीत सिंग सरन यांनी केले आहे. हा चित्रपट 13 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

शहनाजने व्हिडीओ शेअर करत लिहिले, ‘लाइट्स, कॅमेरा आणि कधीही न संपणाऱ्या वाईब्स! ‘इक कुडी’च्या पडद्यामागील क्षण, जिथे प्रत्येक फ्रेम एक कथा आहे आणि प्रत्येक क्षण जादुई आहे. हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहे. 13 जूनला भेटूया!’ या व्हिडीओत शहनाज रिहर्सल करताना दिसते आणि तिच्या मेहनतीची झलक चाहत्यांना अनुभवायला मिळत आहे. व्हिडिओला दिलजीत दोसांझचे लोकप्रिय गाणे ‘डॉन’ पार्श्वभूमीला ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे व्हिडीओ आणखी आकर्षक वाटत आहे.

शहनाजने काही दिवसांपूर्वी तिच्या चित्रपटाच्या घोषणेसाठी पोस्टर शेअर केले होते. पोस्टर शेअर करताना तिने लिहिले होते, ‘आमच्या चित्रपटाची घोषणा करताना मला मनापासून आनंद होत आहे. ‘इक कुडी’ 13 जून 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.’

याशिवाय चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर करत शहनाजने चाहत्यांना तिच्या प्रवासाचा भाग बनवले. फोटोमध्ये ती क्लॅपरबोर्डसह पोज देताना आणि शूटिंगपूर्वी प्रार्थना करताना दिसते. शहनाजचा हा नवा प्रवास तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी मोठा उत्साहाचा विषय ठरत आहे. ‘इक कुडी’ हा चित्रपट चाहत्यांसाठी नक्कीच एक खास भेट ठरणार आहे.

हेही वाचा :

मराठी माणसाला मारहाण; आदित्य ठाकरे आक्रमक

महायुतीकडून ‘या’ लाडक्या बहिणींना मिळाला धोका?

विराट कोहलीला संताप अनावर, विमानतळावर थेट रिपोर्टशी भिडला Video

लोकसभा झाल्या, विधानसभाही संपल्या आता लागले महापालिका निवडणुकीचे वेध