हार्दिकनंतर कर्णधार कोण? रोहित शर्मा नव्हे तर ‘या’ खेळाडूकडे सोपवणार धुरा?

आयपीएलला सुरुवात झाली असून यंदाचा सिझन सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या(player) टीमची फार चर्चा सुरु होती. या चर्चेच कारण म्हणजे आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार बदलला. यावेळी कर्णधार रोहित शर्माचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. अशातच मुंबई इंडियन्सचे 3 सामने झाले असून यापैकी एकाही सामन्यात मुंबईच्या टीमला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवणार का अशा प्रश्न उपस्थित होतोय.

मुंबईच्या सलग 3 पराभवामुळे टीम मॅनेजमेंचने हार्दिकला(player) कर्णधारपद देण्यावर प्रश्न उपस्थित केलं. अशातच आता नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालीये. मात्र ही ऑफर रोहितने स्पष्टपणे नाकारली आहे. इतकंच नाही तर यंदाचा आयपीएलचा सिझन संपल्यावर मुंबईची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हार्दिकनंतर मुंबईचा कर्णधार कोण होणार हा मोठा प्रश्न आहे.

त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले असून ते सातत्याने टीमवर निशाणा साधतायत. याशिवाय भर स्टेडियममध्येही हार्दिक पंड्याला चाहत्यांकडून ट्रोल कऱण्यात येतंय. आजच्या आधी कदाचित कोणत्याही कर्णधाराला एवढ्या टीकाना सामोरं जावे लागलं असेल, असंही दिग्गजांचं म्हणणं आहे. जर हे असंच सुरु राहिल्यास हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून दूर केलं जाण्याची शक्यता आहे.

आता चर्चा रंगलीये की, जर इतक्या दबावानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवलं तर संघाचे नेतृत्व कोणाकडे सोपवले जाणार आहे. अशावेळी रोहित शर्माला पुन्हा संघाचा कर्णधार बनवण्याची शक्यता आहे. काही क्रिकेट तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, रोहित शर्माने कर्णधारपद नाकारलं असून अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह दुसरा पर्याय आहे. अद्याप याबाबत अधिकृतपणे माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा :

शिंदेंच्या शिवसेनेवर कमळाबाईचा कंट्रोल; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

ब्रेकअपमधून सावरण्यासाठी मिळणार एक आठवड्याची सुट्टी; ‘या’ कंपनीने आणली नवी पॉलिसी

‘मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर….’ संजय राऊतांचा हल्लाबोल