MI vs CSK सामन्यात मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण? रोहित शर्माच्या नावावर फुली! 

मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पहिल्या सामन्यात (match)नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली खेळावे लागणार आहे. मुंबई इंडियन्स IPL 2025 मध्ये पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सला चेपॉकवर भिडणार आहे.

या सामन्यात(match)हार्दिक पांड्या खेळणार नाही. आयपीएलच्या मागील पर्वात हार्दिकवर वेळेत षटक पूर्ण न केल्याची चूक दोन वेळा केल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार त्याच्यावर एका सामन्याची बंदी आहे आणि त्यामुळेच तो MI Vs CSK लढतीत खेळणार नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर तो पुन्हा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल अशी चर्चा रंगली होती. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत त्याच्याकडेच नेतृत्व जाईल अशी चाहत्यांना आशा होती.

आयपीएलचे सर्वाधिक जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा आदी खेळाडू दाखल झाले आहेत. पण, हार्दिकने हिटमॅनच्या चाहत्यांना निराश करणारे अपडेट्स दिले आहेत.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित नव्हे तर सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार असल्याचे हार्दिकने पत्रकार परिषदेत जाहीर केले. तो म्हणाला, सूर्या भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार आहे आणि माझ्या गैरहजेरीत पहिल्या सामन्यात तो मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. MI – CSK दोन्ही संघांसाठी ही एक मोठी आव्हानात्मक लढत आहे. मी नेहमीच अशा स्पर्धांचा आनंद घेत आलो आहे आणि या सामन्यासाठी उत्सुक आहे. संघासाठीही यामध्ये थोडा अधिक उत्साह आणि ऊर्जा आहे.

हेही वाचा :

कहाणी एका शिक्षकाची! हृदय पिळवटून टाकणारी !

‘आम्हाला आमच्या टीमचा अभिमान आहे… ‘सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर NASAने व्यक्त केल्या भावना

महिला पोलिसाची वर्दी खेचत विनयभंग; हिंसाचार करणाऱ्यांकडून अश्लील शिविगाळ अन् चाळे