महाराष्ट्राचे कारभारी कोण? 23 नोव्हेंबर रोजी ठरणार!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अखेर महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभांच्या(assembly) निवडणुकांचे बिगुल वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त श्री. राजीव कुमार यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आणि दिनांक 23 नोव्हेंबर रोजी निकालो घोषित केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राचे कारभारी कोण याचा फैसला होणार आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा(assembly) निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर पर्यंत आहे. या निवडणुकीचा एकूण कार्यक्रम 35 दिवसांचा आहे. निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा मंगळवारपासून लागू करण्यात आली आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

विधानसभेच्या विद्यमान सभागृहाची मुदत दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे त्या आधीच महाराष्ट्राचे कारभारी कोण हे ठरले जाणार आहे. गेल्या पाच वर्षात दोन सरकारी पडली. दोन मजबूत पक्षात उभी फूट पडली. इसवी सन 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांचा पहाटे शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले पण त्यांचं म्हणजे दोघांचा सरकार अवघ्या 82 तासात कोसळलं. त्यानंतर”आम्हाला जनतेने विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला आहे”असे सांगत शरद पवार यांनी महाविकास आघाडीची स्थापना करून बहुमताच्या आधारे सरकार स्थापन केले आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीत राज्यसभा निवडणूक झाली आणि त्यानंतरच्या दहा दिवसात म्हणजे दिनांक 20 जून रोजी विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक झाली. आणि त्याच दिवशी म्हणजे दिनांक 20 जून रोजी च्या रात्री बारा वाजल्यानंतर 13 आमदारांसह ठाकरे मंत्रिमंडळात नगर विकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले आणि काही दिवसात अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांचे सरकार कोसळले.

एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. भाजपाकडे आमदारांचे संख्याबळ 105 असताना केवळ 41 आमदारांचे संख्याबळ असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यात आले तेव्हा साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर दिनांक 3 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंड झाले. 54 पैकी 40 आमदारांना घेऊन अजितदादा पवार हे सत्ताधाऱ्यांच्या मांडवात गेले. त्यांच्यासह नऊ जणांचा मंत्र म्हणून त्याच दिवशी शपथविधी झाला आणि त्यानंतर “महायुती सरकार” अशी शिंदे सरकारची ओळख बनली.

उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष सुरू झाला. त्याबद्दल चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने दिला. त्यातून एकनाथ शिंदे सरकार वाचले. आता शिंदे गट, अजित दादा गट आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणातील हवा निघून गेली आहे.

दोन सरकारे पडल्यानंतरच्या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक होत असून तिला एक प्रकारचे अनन्य साधारण महत्व आहे. ही निवडणूक प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होत असली आहे. प्रकाश आंबेडकर यांची बहुजन समाज वंचित आघाडी, तर संभाजी राजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी आणि बच्चू कडू यांची प्रहार संघटना यांची परिवर्तन महाशक्ती तिसऱ्या गाडी या दोन आघाड्याही या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांचा सकल मराठा समाज ही संघटनाही निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रात विधानसभेच्या(assembly) एकूण 288 जागा आहेत. मुंबई विभाग 36, पश्चिम महाराष्ट्र 58, कोकण ३९, विदर्भ 62, मराठवाडा 46, आणि खानदेश 47 अशा विधानसभा जागा आहेत. एस सी प्रवर्गासाठी 29 आणि एसटी प्रवर्गासाठी 25 अशा 54 जागांवर जातीय आरक्षण आहे. यंदा महिला मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे 4 कोटी 64 लाख इतकी आहे तर पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 59 लाख आहे त्यात वयाची शंभरी पार केलेले तब्बल 49 हजार महिला व पुरुष मतदार आहेत.

हेही वाचा:

अजित पवारांना दे धक्का, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचाच राजीनामा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 निकाल

1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढीची शक्यता